शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

दुकान फोडून मोबाइल चोरणा-यास सिडको पोलिसांनी केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:36 IST

टीव्ही सेंटर परिसरातील जिजाऊ चौकात असलेले मोबाइल दुकान चोरट्यांनी फोडत ३ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शुक्रवारी (दि. २४) मध्यरात्री घडली पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-याची चाचपणी करून एकास अटक करण्यात यश आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : टीव्ही सेंटर परिसरातील जिजाऊ चौकात असलेले मोबाइल दुकान चोरट्यांनी फोडत ३ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शुक्रवारी (दि. २४) मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात मोबाइल दुकान मालकाने अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सिडको पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-याची चाचपणी करून एकास अटक करण्यात यश आले आहे. विनोद अशोक हिवाळे (२१, रा. हर्सूल) असे अटक केलेल्या चोरट्याचे नावआहे.याविषयी सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी माहिती दिली की, टीव्ही सेंटर परिसरातील जिजाऊ चौकात अण्णासाहेब एकनाथ पवार (४६, रा. एन १२, हडको) यांचे मोबाइलचे दुकान आहे. गुरुवारी (दि. २३) रोजी दुकानमालक पवार यांनी रात्री नित्यनेमाप्रमाणे दुकान रात्री १० दहा वाजता बंद केले. मध्यरात्री तीनच्या सुमारास दोन चोरट्यांनी मोबाइल दुकानाचे शटर तोडून प्रवेश करीत दुकानातील ५४ मोबाइल व २६ हजार ७०० रुपये रोख रक्कम असा ३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार दुकानमालक पवार यांना सकाळी लक्षात आला. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती सिडको पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली.५४ पैकी ४० मोबाइल काढून दिले...विनोद हिवाळे यास अटक केल्यानंतर त्याने चोरीतील दडवून ठेवलेले ४० मोबाइल पोलिसांना काढून दिले. या प्रकरणातील दुसरा आरोपी आकाश महादेव गावडा फरार असून, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रजापती यांनी दिली. याविषयी अधिक तपास फौजदार भरत पाचोळे करीत आहेत.