शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पारधमध्ये जवानाकडून पोलिसांना मारहाण

By admin | Updated: March 5, 2017 00:26 IST

पारध : भोकरदन तालुक्यातील पारध येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर सुटीवर आलेल्या सैन्यातील जवानाने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली.

पारध : भोकरदन तालुक्यातील पारध येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर सुटीवर आलेल्या सैन्यातील जवानाने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करुन जखमी केल्याची घटना शनिवारी दुपारी जनता महाविद्यालय परिसरात घडली. या प्रकरणी पोलीस कॉन्सटेबल विकास जाधव यांच्या फिर्यादीवरून जवान सौरभ रमेश महाले यांच्याविरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.शनिवारी दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान जनता विद्यालय केंद्रावर राज्यशास्त्राचा पेपर सुरु आसताना धामणगाव (जि.बुलडाणा) येथील रहिवासी जम्मू येथे सैन्य दलात कर्तव्यावर आहे. सध्या सुटीवर गावाकडे आलेला सौरभ रमेश महाले हा त्या परीक्षा केंद्रावर त्याच्या भावाला कॉपी देण्याच्या उद्देशाने आला असताना तेथे कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी विकास जाधव आणि पो. कॉ. सोनवणे यांनी त्यास हटकले यावरून पोलीस कर्मचारी आणि जवान महाले यांच्या बाचाबाची झाली. त्यातूनच महाले याने पोलीस जाधव यांच्या मारहाण केल्याने ते जखमी झाले. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांना मारहाण झाल्याची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरल्याने परिसरात बघ्यांनी गर्दी केली होती. सहकाऱ्याच्या मदतीने जखमी जाधव याला धाड (जि.बुलडाणा) येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. (वार्ताहर)