जालना : वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी बंदोबस्तासह गेलेल्या वन कर्मचारी व पोलिसांवर अतिक्रमणधारकांनी आगीचे गोळे व दगडफेक करीत हल्ला चढविल्याची घटना घडली.रविवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास वखारी वडगाव शिवारात घडली.जालना तालुक्यातील वखारी वडगाव शिवारातील गट नं. १३१ मधील वन विभागाच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी जेसीबी मशिनसह ४० कर्मचारी आणि पोलिसांचा ताफा दाखल झाला होता. अतिक्रमण पाडत असताना तुकाराम राठोड व रंजित राठोड या दोघांनी अतिक्रमण हटविण्यास विरोध करुन ही जागा आमची आहे, असा सूर आळवला व रॉकेलने भरलेली बादली आणून त्यात मिरची पावडर टाकून आगीचे गोळे पथकावर भिरकावले. तसेच दगडपेक केली.याप्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात वन रक्षक अनिल जाधव यांच्या फिर्यादीवरुन तुकाराम राठोड व रंजित राठोड या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येवून त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
वन कर्मचाऱ्यांसह पोलिसांवर हल्ला
By admin | Updated: May 25, 2015 00:23 IST