शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

पैठणमध्ये वाळू तस्करांना पोलिसांचे मिळतेय अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:49 IST

पोलीस व महसूल यंत्रणेकडून अभय मिळत असल्याने काही काळ कडकडीत बंद असलेल्या वाळूतस्करीच्या धंद्यात पैठण परिसरातील गोदावरी नदीपात्रात वाळूतस्करांनी पुन्हा डोके वर काढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पोलीस व महसूल यंत्रणेकडून अभय मिळत असल्याने काही काळ कडकडीत बंद असलेल्या वाळूतस्करीच्या धंद्यात पैठण परिसरातील गोदावरी नदीपात्रात वाळूतस्करांनी पुन्हा डोके वर काढले आहे. विशेष म्हणजे वाळूच्या धंद्यात जर्जर झालेल्या जुन्या तस्करांनी या धंद्यातून माघार घेतलेली असताना अधिकाºयांचा ‘आशीर्वाद’ घेत या धंद्यात नवीन युवकांची फळी उतरली आहे. या फळीकडून वाळूच्या गोरखधंद्याचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. दररोज लाखो रुपयांची वाळू गोदावरीच्या नदीपात्रातून ओरबडली जात आहे. असे असताना महसूल व पोलीस अधिकारी मात्र सर्व आलबेल असल्याचा दावा करीत आहेत.आरी व केणीने उपसारात्रभर केणी, आरी नावाचे यंत्र ट्रॅक्टरला लावून गोदावरीच्या नदीपात्रातील पाण्यातून वाळूचा अवैध उपसा करण्यात येत आहे. सदरील उपशाचे ढीग गोदावरी काठावर ठिकठिकाणी करण्यात येत आहेत. याठिकाणी ट्रक, ट्रॅक्टर, हायवा, बैलगाडी, अ‍ॅपेरिक्षा, बैलगाडीत ही वाळू भरून ग्राहकापर्यंत पोहोच केली जात आहे.शेवगाव व पैठण तालुकानवीन बाजारपेठऔरंगाबाद शहरात वाळू घेऊन जाणे कठीण झाल्याने वाळूतस्करांनी वाळूची बाजारपेठ बदलली असून, वाळूची विक्री पैठण शहर, पैठण तालुका व पैठण तालुक्याला लागून असलेल्या शेवगाव तालुक्यात करण्यात येत आहे. पैठण व शेवगाव तालुक्यात सुरू असलेल्या बांधकामास पैठणची वाळू पुरविली जात आहे. रात्रीच्या वेळी बिनबोभाटपणे वाळूची वाहतूक करण्यात येत आहे.गोदापात्रावर तस्करांचा ताबागोदावरी नदीपात्राचा वाळूचोरांनी ताबा घेतला असून, पैठण नाथ मंदिराच्या पाठीमागील नदीच्या पलीकडे असलेल्या कावसान (जुने) परिसरात यंत्राचा वापर करून वाळू ओरबाडली जात आहे. शहरापासून काही अंतरावर असलेल्या वडवाळी, नायगाव व मायगाव येथील वाळूपट्ट्यांमध्ये खुलेआम वाळूचा अवैध उपसा करण्यात येत आहे. स्थानिक गावपुढारी व (पान २ वर)वाळूला आला सोन्याचा भाववाळूपट्टे बंद असल्याने सध्या वाळूला विक्रमी भाव मिळत आहे. आज रोजी बैलगाडी भरून वाळू ९०० रुपये, तर एक ट्रॅक्टर वाळू ३,००० रुपये अशा भावाने विक्री करण्यात येत आहे. हायवा ट्रक भरून वाळू ४० हजार रुपयांना विकली जात आहे. पैठण परिसरात २५ ट्रक, ३० ते ३५ ट्रॅक्टर व ३० ते ४० केणी मशीन अनधिकृत परवानगीने सुरू आहे.पोलिसांनी कारवाई करावी -तहसीलदारयाबाबत तहसीलदार महेश सावंत म्हणाले की, मी खाजगी वाहनाने कारवाई करीत आहे. असे असले तरी पैठण पोलिसांना रात्री गस्त घालताना वाळूचे वाहन दिसून आल्यास कारवाई करण्याचे सांगण्यात आले आहे.येथे होतो अवैध वाळू उपसाकावसान, आपेगाव, वडवाळी, मायगाव नायगाव, नवगाव, दादेगाव, पाटेगाव, आयटीआय परिसर, हिरडपुरी, टाकळी अंबड आदी परिसरात गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा करण्यात येत आहे. याशिवाय तालुक्यातील छोट्या-मोठ्या नद्या, ओढे यातूनही उपसा करण्यात येत आहे.पैठणच्या तहसीलदारांना वाहन नाहीवाळूचोरीस प्रतिबंध व कारवाई करण्यासाठी पैठणच्या तहसीलदारांना वाहनच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. जवळपास वर्षभरापासून पैठणचे तहसीलदार खाजगी कारचा वापर करीत आहेत. यामुळे तहसीलदारांच्या कारवाईस मर्यादा आल्या आहेत. या कारणानेही वाळूतस्करांचे चांगलेच फावले आहे. वाळूपट्ट्याने संपन्न असलेल्या तालुक्यातील तहसीलदारांना महसूल प्रशासन वाहन उपलब्ध का करून देत नाही, असा प्रश्नही सर्वसामान्य जनतेला पडला आहे.