शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

पोलिसांनी घेतली गुन्हेगारांची ‘परेड’

By admin | Updated: June 7, 2016 23:49 IST

औरंगाबाद : शहरात वाहनचोऱ्या, घरफोड्या, खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी सोमवारी रात्री संपूर्ण शहरात ‘आॅपरेशन आॅल आऊट’ राबविले.

औरंगाबाद : शहरात वाहनचोऱ्या, घरफोड्या, खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी सोमवारी रात्री संपूर्ण शहरात ‘आॅपरेशन आॅल आऊट’ राबविले. त्याअंतर्गत ‘रेकॉर्ड’वरील तब्बल अडीचशे गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली. त्यांची मग आयुक्तालयात मंगळवारी दुपारी चांगलीच ‘हजेरी’ घेण्यात आली. नीट राहा, सुधरा, गुन्हे करताल तर याद राखा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा दम पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारांना भरला. गेल्या काही दिवसांपासून शहरात खुनाचे सत्र सुरूआहे. एकापाठोपाठ एक खुनाच्या घटना घडत आहेत. या शिवाय वाहन चोरांनी तर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दररोज शहरातून दोन, तीन वाहने चोरी जात आहेत. घरफोड्यांचे सत्रही थांबण्यास तयार नाही. हे गुन्हे करणारे कोण आहेत, हे निश्चित पोलिसांना समजेनासे झाले आहे. रात्रभर गुन्हेगारांची धरपकडनिश्चित गुन्हेगार काही सापडत नसल्याने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुन्हा एकदा गुन्हेगारांची ‘हजेरी’ घेण्याचे ठरविले. त्यासाठी सर्वच पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना, गुन्हेशाखेला रेकॉर्डवरील गुन्हेगार पकडून आणण्याचे आदेश जारी करण्यात आले. सोमवारी रात्री या ‘आॅपरेशन आॅल आऊट’सुरुवात झाली. प्रत्येक पोलीस ठाण्याला २० गुन्हेगार पकडून आणण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार रात्रभर आपापल्या हद्दीत जंगजंग पछाडत पोलिसांनी एकूण २५० गुन्हेगारांची धरपकड केली. काय फरक पडणार?आठ महिन्यांपूर्वीही पोलीस आयुक्तांनी अशाच पद्धतीने रेकॉर्डवरील सर्वच गुन्हेगारांना पकडून आयुक्तालयात आणून त्यांची चांगलीच ‘हजेरी’ घेतली होती. मात्र, त्यानंतर गुन्हेगारी काही कमी झाली नव्हती. आता पुन्हा मंगळवारी तोच पाढा गिरविण्यात आला. मंगळवारच्या ‘दमबाजी’ने गुन्हेगारांमध्ये किती फरक पडतो, हे लवकर दिसून येईल. आयुक्तालयात भरली ‘शाळा’‘आॅपरेशन आॅल आऊट’मध्ये पकडलेल्या सर्व गुन्हेगारांना सकाळी पोलीस आयुक्तालयातील अलंकार सभागृहात आणून बसविण्यात आले. मग दुपारी या सर्वांना एका ठिकाणी बसवून पोलीस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदीप आटोळे, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी त्यांची ‘परेड’ घेतली. एका एका गुन्हेगाराला उभा करून आयुक्तांनी त्याची कुंडली जाणून घेतली आणि मग सर्वांना नीट राहा, यापुढे गुन्हे कराल तर गाठ आमच्याशी आहे. गंभीर कायदेशीर परिणाम भोगावे लागतील’ अशा शब्दात आयुक्तांनी या गुन्हेगारांना दम भरला.