शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

पोलिस प्रशासन आॅनलाईन होणार

By admin | Updated: February 8, 2015 00:11 IST

लातूर : पोलिस प्रशासनामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील ‘क्राईम अ‍ॅण्ड क्रिमिनिल टेस्टिंग नेटवर्क’ प्रशिक्षण सुरू केले आहे

लातूर : पोलिस प्रशासनामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील ‘क्राईम अ‍ॅण्ड क्रिमिनिल टेस्टिंग नेटवर्क’ प्रशिक्षण सुरू केले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाभरातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन प्रशासन आॅनलाईन करण्याचा संकल्प जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केला आहे.बँकेतील आॅनलाईन कारभाराप्रमाणेच पोलिस प्रशासनातील कामकाजातही आॅनलाईन कामकाज लवकरच सुरू होणार आहे. जिल्हाभरातील कुठल्याही पोलिस ठाण्यामध्ये आॅनलाईन तक्रार नोंद झाल्यानंतर त्या-त्या क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देशभरात कुठेही दाखल झालेल्या तक्रारींचा लेखाजोखा पहायला मिळणार आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम २०१३ पासून सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा सुरू असून, लातूर जिल्ह्यातील १०१ अधिकारी व १४३८ पोलिस कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे प्रशिक्षण देऊन तिसऱ्या दिवशी सदरील कर्मचाऱ्याला आॅनलाईन प्रशिक्षणाचे ज्ञान अवगत झाले की नाही, याची खात्री होण्यासाठी १०० गुणांची परीक्षा घेण्यात येत आहे. पोलिस प्रशासन आॅनलाईन करण्याच्या संकल्पनेला मूर्त रुपात आणण्याचे काम जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलिस अधीक्षक काकासाहेब डोळे, उपाधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.(प्रतिनिधी)लातूर जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षणाच्या तिसऱ्या दिवशी सदरील अधिकारी-कर्मचाऱ्यांची १०० गुणांची परीक्षा घेऊन संगणकाच्या परिपूर्ण ज्ञानाची खात्री पोलिस प्रशासनाकडून केली जात आहे. बहुतांश कर्मचाऱ्यांंना संगणकाचे ज्ञान असल्याने लातूर जिल्ह्यातील आॅनलाईन प्रक्रियेला गती येणार आहे.