शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस प्रशासन दक्ष आहे; नागरिकांनीही सजग रहावे

By admin | Updated: June 25, 2017 23:39 IST

वसमत : ईद उत्साहात साजरी करण्यासाठी पोलीस प्रशासन दक्ष आहे. नागरिकांनीही अप्रिय घटना घडणार नाही, यासाठी सजग राहावे.आवाहन पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : ईद उत्साहात साजरी करण्यासाठी पोलीस प्रशासन दक्ष आहे. नागरिकांनीही अप्रिय घटना घडणार नाही, यासाठी सजग राहावे. त्याचप्रमाणे बेवारस वस्तू किंवा अनोळखी व्यक्तीसंदर्भात माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी केले. वसमत येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर वसमत येथे शनिवारी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी पोलीस अधीक्षक अरविंंद चावरिया, उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशीद, तहसीलदार उमाकांत पारधी, उपनगराध्यक्ष खैसर अहेमद, मौलाना बाशीद, पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल आदींची उपस्थिती होती. यावेळी शांतता समितीच्या सदस्यांनी ईदच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची खबरदारी व सूचना मांडल्या. वसमत शहरात सुरू झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत तहसीलदार पारधी व पोलीस निरीक्षकांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक अनेक सदस्यांनी केले. पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल यांनी अवैध धंदे व अवैधधद्यांना पडद्याआडून पाठबळ देणाऱ्यांवर सरळ केल्याच्या भावनाही अनेकांनी या बैठकीत बोलून दाखवल्या. पोलीस अधीक्षकांनी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या व शांतता सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला असल्याचे सांगून नागरिकांनीही पोलिसांच्या मदतीला राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बैठकीस शांतता कमिटीच्या सदस्यांसह नागरिक, पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.