शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या कारवाईची ‘कोंडी’

By admin | Updated: May 25, 2016 00:30 IST

औरंगाबाद : बऱ्याच वर्षांनंतर अखेर मंगळवारी वाहतूक शाखा पोलिसांनी ‘खाक्या’ दाखवीत का होईना रोशनगेट रोडवरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी ‘साफसफाई’ मोहीम राबविली.

औरंगाबाद : बऱ्याच वर्षांनंतर अखेर मंगळवारी वाहतूक शाखा पोलिसांनी ‘खाक्या’ दाखवीत का होईना रोशनगेट रोडवरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी ‘साफसफाई’ मोहीम राबविली. अनेक वर्षांपासून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर पोलीस कारवाई करीत असतानाच एमआयएमच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी मात्र, राडेबाजी करीत, धुडगूस घालीत पोलिसांच्या या मोहिमेचीच ‘कोंडी’ करण्याचा प्रयत्न केला. अखेर धुडगूस घालणाऱ्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना बळाचा सौम्य वापर करावा लागला. त्यामुळे रोशनगेट भागात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. रोशनगेट, किराडपुरा, मौलाना आझाद चौक, चेलीपुरा रोडवर अनेक ठिकाणी रस्त्यात अनेक वर्षांपासून भंगार, जुनी वाहने उभी करून ठेवलेली आहे. शिवाय आसपासचे दुकानदारही रस्त्यावरच वाहने उभी करतात. फेरीवालेही हा रस्ता व्यापून घेतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची सातत्याने कोंडी होते. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे.सध्या वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीमच वाहतूक शाखा पोलिसांनी हाती घेतलेली आहे. सतत कोणत्या ना कोणत्या भागात ही मोहीम राबविण्यात येत आहे. मंगळवारी शहर वाहतूक शाखेने सकाळच्या वेळी अखेर रोशनगेट परिसराकडे मोर्चा वळविला. या रस्यावर गेल्या अनेक वर्षांमध्ये पोलिसांनी कारवाई केलेली नव्हती. वाहतूक शाखेचे निरीक्षक मुदिराज, सहायक निरीक्षक (पान २ वर)मोहीम सुरूच राहणाररोशनगेट, चंपाचौक, चेलीपुरा, मौलाना आझाद चौक, कटकटगेट, शहागंज आणि परिसरात वाहतुकीचा सतत खोळंबा होत असतो. ही कोंडी फोडण्यासाठी यापुढेही सतत अशी मोहीम सुरूच ठेवण्यात येणार आहे. या चांगल्या कामाला सर्वांचे सहकार्य मिळेल. जर ही मोहीम राबविताना पोलिसांकडून मारहाण, तोडफोड झाली असेल तर त्याची चौकशी करू.- अमितेशकुमार (पोलीस आयुक्त)जमावातील या गर्दीतून कुणी तरी पोलीस विनाकारण आम्हाला त्रास देत आहेत, दादागिरी करीत आहेत, असे म्हणत मारो इनको, अशी चिथावणी दिली. त्यामुळे जमाव बिथरला. आक्रमक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचे प्रत्यक्षदर्र्शींनी सांगितले. या गोंधळामुळे धावपळ उडाली. परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला. नंतर घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाल्याने जमाव पांगला.रस्ता झाला ‘साफ’४जिन्सी चौक ते रोशनगेट रस्त्यावर अनेक वर्षांपासून अनेक भंगार वाहने पडलेली होती. त्यातील तीन वाहने पोलिसांनी या कारवाईत जप्त केली. अन्य अनेक वाहने नागरिकांनी तेथून काढून घेतली, तर रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षा, इतर वाहने, अशी सुमारे अडीचशे वाहने येथून हटविण्यात आली. त्यामुळे हा रस्ता अनेक वर्षांनंतर ‘साफ’ झाला. पोलिसांवरच आरोपया धावपळीत एक मुलगा जखमी झाला. त्यानंतर जमाव अधिक चिडला. पोलिसांनी या मुलाला मारहाण केली. शिवाय वाहतूक शाखेच्या पोलिसांनी रोशनगेटवर येताच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांच्या थेट काचा फोडल्या. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना मारहाण केली, पोलीस दादागिरी करीत आहेत, असा आरोप करीत एमआयएमच्या नगरसेवकांनी जमाव घेऊन थेट जिन्सी पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात या जमावाने चांगलाच गोंधळ घातला. सहायक निरीक्षक शेख अकमल यांच्याविरुद्ध कारवाई करा, गुन्हा नोंदवा, अशी मागणी या जमावाने केली.