शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

गणवेश वाटपाचे नियोजन बारगळणार

By admin | Updated: June 8, 2017 23:51 IST

हिंगोली :गणवेश वाटपाचे शिक्षण विभागाकडून नियोजन बारगळणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शाळा उघडताच पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे शिक्षण विभागाकडून दरवर्षी नियोजन केले जाते. मात्र निधी वेळेत उपलब्ध होत नसल्याने गणवेश वाटपाचे नियोजन दरवर्षी बारगळते. यावर्षीपासून सदर गणवेशाची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार होती. मात्र अद्याप विद्यार्थ्यांच्या ती जमा झाली नाही. सदर योजनेसाठी लागणारा निधीच शासनाकडून उपलब्ध झाला नसल्याचे सर्व शिक्षाने सांगितले. जिल्हा परिषद व अनुदानित शाळेतील पात्र विद्यार्थी व सर्व विद्यार्थिनींना सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत गणवेश वाटप केले जातात. शिवाय येत्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शाळा उघडण्यास केवळ सहा दिवस उरले आहेत. परंतु निधीच उपलब्ध न झाल्याने बँक खात्यावर रक्कम जमा झाली नाही. शासनाच्या नवीन निर्णयानुसार आता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर दोन गणवेशांची रक्कम जमा केली जाणार आहे. यासाठी पालकाचे व लाभधारक मुलाचे बँकेत जॉर्इंट खाते काढण्याची अट शासनाने घातली असून ती पूर्ण करणे बंधनकारक आहे. परंतु किती विद्यार्थ्यांचे बँक खाते अद्ययावत झाले आहे, याबाबत शिक्षण विभागाकडे माहिती उपलब्ध झालेली नाही. वेळेत गणवेश वाटपाचे संबधित गटशिक्षणाधिकाऱ्यांना वारंवार कळविण्यात आले होते. शिवाय शिक्षणाधिकाऱ्यांनी सूचनाही दिल्या होत्या. परंतु निधीच उपलब्ध न झाल्याने ‘शाळा उघडताच विद्यार्थ्यांच्या हाती गणवेश’ नियोजन बारगळणार असल्याचे दिसून येत आहे. एससी, एसटी व बीपीएलधारक विद्यार्थ्यांसाठी तर सर्व प्रवर्गातील मुलींसाठी शासनाकडून मोफत गणवेश वाटपाची योजना राबविली जाते.