शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाचा पूर्णत: फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:38 IST

कर्णपुरा यात्रेत वरकमाईच्या जत्रेमुळे नियोजनाचा पूर्णत: फज्जा उडाला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कर्णपुरा यात्रेत वरकमाईच्या जत्रेमुळे नियोजनाचा पूर्णत: फज्जा उडाला आहे. छावणी, पालिका, महसूल प्रशासनातील समन्वयाअभावी यात्रेत येणा-या भक्तांना विशेषत: महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.पहाटेपासून अनवाणी दर्शनाला जाणाºया भक्तांना देवीच्या मंदिरापर्यंत जाताना खडी असलेल्या रस्त्यावरून जावे लागत आहे. सिमेंटही ओबडधोबड टाकून ठेवल्यामुळे अनेक भक्तांच्या पायांना जखमा होत आहेत. याकडे कोण लक्ष देणार, असा प्रश्न असून नफेखोरीच्या नादात यात्रेच्या ‘स्टॅर्ण्डड आॅपरेटिंग प्रोसेस’ चा कुठेही वापर झालेला दिसत नाही.जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी यात्रा म्हणून कर्णपुरा येथील यात्रा प्रसिद्ध आहे. १३ ते १५ लाखांदरम्यान भाविक यात्रेनिमित्त येतात. त्यामुळे या यात्रेचे नियोजन महत्त्वाचे असताना यंदा पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचे दिसते.महावीर चौकातील उड्डाणपुलाखालून छावणीची हद्द सुरू होते. सुुरुवातीपासून मंदिरापर्यंत १०० फू ट रस्त्यात ये-जा करण्यासाठी प्रयोजन करण्याऐवजी ५० फूट मार्ग शिल्लक राहिला आहे. रहाटपाळण्यासह इतर दुकाने रस्त्यावर लावण्यात आली आहेत.३३ लाख ७५ हजारांत पूर्ण यात्रा परिसराचा ठेका छावणी परिषदेने दिला. १ कोटींपेक्षा अधिकची रक्कम ठेकेदारांनी कमविली आहे. यामध्ये पूर्ण यात्रेचा मार्ग विकून टाकल्याने खडी व चिखल असलेल्या मार्गाने भक्तांना यावे लागते आहे. अग्निशमनचे वाहन ये-जा करील एवढी जागादेखील शिल्लक नाही. आपत्कालीन मार्गाची व्यवस्था नाही. छावणीचे सीईओ विजयकुमार बालन नायर यांनी मोफत पार्किंगचे पत्र काढले असले तरी मनपा हद्दीत पार्किंगसाठी रक्कम द्यावीच लागते. मोफत पार्किंगवर लावलेल्या वाहनांची हवा सोडण्याचा प्रकार रविवारी घडला.महसूल प्रशासनाचे मत असे...उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल म्हणाले, यात्रेचे पूर्ण व्यवस्थापन छावणीकडे आहे. छावणी परिषदेची यात्रेच्या नियोजनासाठी वेगळी एसओपी आहे.छावणी परिषदेची जबाबदारीमंदिर परिसर मोकळा असावा. तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाºयांशी समन्वय ठेवून उपाययोजना कराव्यात. भाविकांसाठी दर्शन करण्यासाठी दोन स्वतंत्र मार्ग ठेवण्यात यावेत. मार्गातील अतिक्रमणे काढून टाकावीत. रोज पाहणी करून नियोजन करणे गरजेचे आहे.पार्किंगमध्ये लूटपरिषदेने पार्किंगसाठी टेंडर काढले. ३५ लाखांपर्यंत आलेले टेंडर प्रशासनाने रद्द केले.मोफत पार्किंगची सुविधा दिली असली तरी सुरक्षा वा-यावर आहे. दुसरीकडे पंचवटी चौकात २० रुपये दुचाकीसाठी घेऊन पार्किंगची सुविधा देण्यात आली आहे. हे दर कोणत्या कुणी ठरविले, याचे उत्तर कुणाकडेही नाही.