औरंगाबाद : लोकमत सखी मंचतर्फे सदस्यांसाठी श्रावण सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात सदस्यांनी मंगळागौरीच्या गाण्यावर फेर धरला. तसेच वेगवेगळ्या स्पर्धांमध्येही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला व ‘पिंगा गं पोरी’ असा पिंगा घालत अवघे संत तुकाराम नाट्यगृह दुमदुमून टाकले. यावेळी सखी मंच अध्यक्ष रेखा राठी, सचिव अनिता कोटगिरे, पद्मजा मांजरमकर, गीता अग्रवाल, सरोज बगाडिया, असोसिएट स्पॉन्सरर भाग्य विजय अॅस्ट्रोवास्तू सोल्युशनचे विजय चाटोरीकर, रिसो राईस ब्रॉन आॅईलचे अमित शर्मा, जयेश ठक्कर, दिवा फॅशनच्या सोनल संचेती आदींची उपस्थिती होती.यावेळी सदस्यांच्या मेंदी, थाळी डेक ोरेशन, श्रावण साज आणि उखाणे या स्पर्धा घेण्यात आल्या. श्रावण महिन्यात श्रावणाचे बहरलेले रूप पाहता या रूपाचे औचित्य साधूनच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्रावण सोहळ्याला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दीप प्रज्वलनाने सोहळ्यास प्रारंभ झाला. प्रेरणा ग्रुप व ओंजळ ग्रुप या दोन्ही ग्रुपने मंगळागौरीच्या वेळी खेळण्यात येणाऱ्या विविध खेळांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. मेंदी, थाळी डेकोरेशन, उखाणे व श्रावण साज या स्पर्धा घेण्यात आल्या.यानंतर लगेचच सख्यांच्या आकर्षणाचे केंद्र असलेली अभिनेत्री ऋजुता देशमुख हिच्याशी मनमोकळा संवाद साधता आला. त्यावेळी बोलताना ऋजुता म्हणाली की, प्रत्येक स्त्रीला तिच्या घरच्यांकडून सहकार्य मिळणे खूप महत्त्वाचे असते. यशस्वीपणे काम करण्यासाठी घरच्यांचे परिपूर्ण सहकार्य खूप गरजेचे असते. माझ्या यशाचेही हेच कारण आहे. याच सोहळ्यात सखी मंच सदस्यांच्या नोंदणीच्या वेळी जिल्हास्तरीय सुवर्ण सखी योजनेचे प्रायोजकत्व प्रोझोन मॉलने स्वीकारले होते. या योजनेत लाखो सखींनी सहभाग नोंदवला होता. त्या सखींपैकी लकी ड्रॉद्वारे भाग्यवान सखींची निवड करण्यात आली. सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले.परीक्षक या होत्या : मेंदी- राधा स्वर्णकार, रुची चोपडा. थाळी डेकोरेशन- संगीता मालपाणी, वेदवती पारीख. श्रावण साज (फॅशन शो) रचना काकडे, संगीता तापडिया. उखाणे- राजश्री रावळे, शुभांगी बोंदरे.
‘पिंगा गं पोरी, पिंगा गं’च्या तालात रंगल्या सख्या
By admin | Updated: August 22, 2014 00:19 IST