शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी,चिलवडीतील तीन कारखाने सील

By admin | Updated: July 28, 2016 00:52 IST

उस्मानाबाद : तालुक्यातील पिंपरी, चिलवडी परिसरातील जनावरांच्या हाडापासून पावडर तसेच तेल तयार करणारे तीन कारखाने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सील करण्यात आले

उस्मानाबाद : तालुक्यातील पिंपरी, चिलवडी परिसरातील जनावरांच्या हाडापासून पावडर तसेच तेल तयार करणारे तीन कारखाने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सील करण्यात आले. कडेकोट पोलिस बंदोबस्तात तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी ही कारवाई केली.उस्मानाबाद तालुक्यातील पिंपरी तसेच चिवडी परिसरात जनावरांच्या हाडापासून पावडर तसेच तेल तयार करणारे कारखाने सुरू आहेत. सदरील उद्योगामुळे उग्र वास येत असल्याची तक्रार पिंपरी, सुर्डी, झरेगाव, वलगुड, जुनोनी, राघुचीवाडी येथील ग्रामस्थांनी केली होती. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले होते. एवढेच नाही तर उग्र वासामुळे मजूरही शेतीमध्ये काम करण्यास येत नव्हते. मांस आणि हाडांमुळे परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता. या मोकाट कुत्र्यांनी अनेक शेतकरी, तसेच जनावरांचे लचके तोडल्याच्या घटनाही घडल्या होत्या. एवढेच नाही तर मांस आणि हाडे वाहून आणणारी वाहनेही वलगूड येथील तलावामध्ये धुतली जात असत. त्यामुळे प्रकल्पातील पाणी दुर्गंधीयुक्त बनले होते. असे दुर्गंधीयुक्त पाणी पिऊन काही शेतकऱ्यांची जनावरे दगावल्याबाबतच्या तक्रारी उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांच्याकडे आल्या होत्या. तक्रारीच्या अनुषंगाने ग्रामसेवक, सरपंच आणि उपसरपंच यांच्या पथकाने संयुक्तरित्या चौकशी केली असता यातील तीन कारखाने अनधिकृतरित्या सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यांना लातूर येथील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची मंजुरीही नव्हती. दरम्यान, याची गंभीर दखल घेत तेजस चव्हाण यांनी १२ जुलै रोजी संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बुधवारी तहसीलदार आणि मंडल अधिकारी यांच्या पथकाने अवैधरित्या सुरू असलेले मुद्येशीर कुरेशी यांचे मे. अलकुरेश बोन मिल, अलिम कुरेशी यांचे मे. एमन एंटरप्रायजेस तर संमती पत्रातील नियम व अटींचे पालन न केल्याचा ठपका ठेवत मे. सिफा बोन मिल अ‍ॅड फर्टीलायझर्स पिंपरी हे कारखाने सील केले. दरम्यान, अटींचे पालन न केल्याप्रकरणी अन्य दोन कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु, त्यांची नावे समजू शकली नाहीत. (प्रतिनिधी)