केळगाव : रोहित्र जळाल्यामुळे सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव घाट येथील ग्रामस्थ तब्बल आठ दिवसांपासून अंधारात आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
पिंपळगाव घाट या गावाचा विजेचा पूर्ण भार रोहित्रावर आहे. रोहित्र नादुरुस्त झाल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांनी वारंवार संपर्क साधला आहे. तरीदेखील याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. रोहित्र जळाल्यामुळे गावातील नागरिकांना रात्रभर जागरण करावे लागत आहे. तसेच पिकांना पाणी देण्यासाठी पदरमोड करुन शेतकरी डिझेल पंपाचा वापर करीत आहेत. या परिसरातील शेतकऱ्यांनी या हंगामातील कपाशी, अद्रक ही पिके लागवड केलेली आहे. पिके बहरलेली असतानाच रोहित्र जळाल्याने पिकांचे नुकसान होईल या विचाराने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच रोहित्र जळाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.याच गावाजवळ केळगाव लघु मध्यमप्रकल्प आहे. या गावासाठी येथूनच पाणी पुरवठा होतो. मात्र, गत आठ दिवसांपासून शेतीलाच नव्हे तर पिण्यासाठीही पाणी नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहेत.
कोट
ऐन पाणी देण्याच्या वेळेस रोहित्र जळाल्याने शेतातील पिकेही सुकू लागली आहेत. संबंधित महावितरण कंपनीने रोहित्र आम्हाला त्वरित रोहित्र उपलब्ध करुन द्यावे.
सुरेश सपंत गवळी, शेतकरी
गेल्या आठ दिवसापासून रोहित्र जळाल्याने पिंपळगाव घाट येथील नागरिकांना समस्येचा सामना करावा लागत आहे. भराडी येथील उपअभियंत्यांना ग्रामपंचायचा ठराव देखील दिलेला आहे. याकडे महावितरणचे अधिकारी, कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
तुकाराम फरकाडे, शेतकरी