शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

लढतीचे चित्र आज होणार स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:53 IST

महापालिका निवडणुकीत छाननीमध्ये ९१४ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून ९९ अर्ज अवैध ठरले आहेत. उमेदवारी मागे घेण्याचा बुधवार अंतिम दिवस आहे. बुधवारी निवडणूक रिंगणातील उमेदवार कोण हे स्पष्ट होणार आहे. निवडणूक प्रक्रियेत हा दिवसही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिका निवडणुकीत छाननीमध्ये ९१४ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून ९९ अर्ज अवैध ठरले आहेत. उमेदवारी मागे घेण्याचा बुधवार अंतिम दिवस आहे. बुधवारी निवडणूक रिंगणातील उमेदवार कोण हे स्पष्ट होणार आहे. निवडणूक प्रक्रियेत हा दिवसही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.मनपा निवडणुकीसाठी ११४८ उमेदवारी अर्ज आॅनलाईन प्राप्त झाले होते. त्यात एकाच उमेदवाराने उमेदवारी अर्जाची झेरॉक्स करुन दोन ते तीन वेळा आॅनलाईन सबमीट केल्याचे प्रकारही पुढे आले आहेत. सोमवारी झालेल्या अर्जांच्या छाननीत आॅनलाईन प्रक्रियेमुळे मोठा विलंब झाला.निवडणूक प्रक्रियेत बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घेता येणार आहे. अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी त्यांची मनधरणीही सोमवारपासून सुरू आहे. यात किती उमेदवार आता माघार घेतील हे स्पष्ट होणार आहे. त्याचवेळी पक्षाने तिकीट न दिलेले किती उमेदवार आपली उमेदवारी कायम ठेवतील, याकडे लक्ष लागले आहे.पक्षाने अधिकृत उमेदवार घोषित केल्यानंतर तिकीट न मिळालेल्या असंतुष्टांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाच्या विरोधातच मोहीम चालवली होती.कोण कोणाचे तिकीट कापले यावरही सोशल मीडियासह कार्यकर्त्यांमध्ये मोठी चर्चा झाली. पक्षासह इच्छुकांनी अपक्ष उमेदवारीही दाखल केली होती. ती उमेदवारी कायम ठेऊन पक्षाच्या किती अधिकृत उमेदवाराला अडचणीत आणले जाते, हेही बुधवारीच दुपारनंतर स्पष्ट होणार आहे.