शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पीएच.डी. ‘व्हायवा’चा बाजार : बहिस्थ परीक्षक म्हणतो, मला काहीच माहिती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 15:22 IST

विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागातील एका संशोधक विद्यार्थ्याचा पीएच.डी. व्हायवा बहिस्थ परीक्षकाला ४० हजार रुपये दिल्यानंतर घेतला जाईल, असे विद्यार्थ्यास मार्गदर्शकांनीच सांगितले.

ठळक मुद्देपीएच.डी. विभाग म्हणते, ३ वेळा संपर्क केला, तारीख दिली नाही बहिस्थ परीक्षक खोटे बोलतो की मार्गदर्शक त्याचा उलगडा होऊ शकला नाही.

- राम शिनगारे 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विषयातील एका संशोधक विद्यार्थ्याचा पीएच.डी. व्हायवा घेण्यासाठी बहिस्थ परीक्षकाने ४० हजार रुपये मागितले असून, ते दिल्यानंतरच व्हायवा होईल, असे पीएच.डी.चे मार्गदर्शक तथा अधिष्ठाता सांगतात. यावर संबंधित बहिस्थ परीक्षकाशी संपर्क साधला असता, त्यांनी मागील वर्षभरात व्हायवासाठी कोणीही संपर्क साधला नसल्याचे सांगितले. तर पीएच.डी. विभागाने त्यांच्याशी तीन वेळा संपर्क साधून तारीख देण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे.

पीएचडीची मौखिक परीक्षा हवी असेल तर ६० हजार मोजा!

विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागातील एका संशोधक विद्यार्थ्याचा पीएच.डी. व्हायवा बहिस्थ परीक्षकाला ४० हजार रुपये दिल्यानंतर घेतला जाईल, असे विद्यार्थ्यास मार्गदर्शकांनीच सांगितले. याविषयी ‘लोकमत’ने भंडाफोड केल्यानंतर कुलगुरूंनी मार्गदर्शक तथा अधिष्ठातांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला. पीएच.डी. व्हायवासाठी बहिस्थ परीक्षक म्हणून परभणी येथील एका महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. सुनील शिंदे यांना बोलावण्यात आले होते. या गैरप्रकाराविषयी डॉ. शिंदे यांच्याशी विद्यापीठातून एका प्राध्यापक संघटनेच्या भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित विद्यार्थ्यांचा शोधप्रबंध मूल्यांकन अहवाल वर्षभरापूर्वीच पाठविला. त्यानंतर आपल्याशी मार्गदर्शक  किंवा विद्यापीठ प्रशासनाने एकदाही संपर्क साधला नसल्याचे सांगितले. त्यामुळे मार्गदर्शक संशोधक विद्यार्थ्यास बहिस्थ परीक्षकाला देण्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी करीत असल्याचे आॅडिओतून स्पष्ट होत आहे. तर बहिस्थ परीक्षक संपर्कच साधला नसल्याचे सांगत आहे. 

पीएच.डी. विभागातून माहिती घेतली असता, त्या  बहिस्थ परीक्षकाने तीन वेळा व्हायवासाठी तारीख देऊन गैरहजर राहिल्यामुळे व्हायवा झाला नाही. तसेच आगामी तारीख देण्यासाठी एक वेळा पत्रव्यवहार केला असून, तीन वेळा भ्रमणध्वनीवर संपर्क साधला.  मात्र, संबंधिताने आपण मार्गदर्शकाशी बोलून तारीख ठरवितो, असे सांगितल्याची सूत्रांनी माहिती दिली. यामुळे बहिस्थ परीक्षक खोटे बोलतो की मार्गदर्शक त्याचा उलगडा होऊ शकला नाही.

‘लोकमत’चे वृत्त सोशल मीडियात व्हायरल‘पीएच.डी.च्या व्हायवासाठी मोजा ६० हजार’ या मथळ्याने ‘लोकमत’मध्ये प्रकाशित वृत्त सोशल मीडियात तुफान व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. व्हॉटस्अ‍ॅपच्या विविध ग्रुपमध्ये या वृत्तावर चर्चा करण्यात येत होती. फेसबुकरवही अनेकांनी उच्चशिक्षणात शिरलेल्या या प्रवृत्तीचा निषेध नोंदवत कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र