औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बुधवारी रात्री उशिरापर्यंत व्यवस्थापन परिषदेची बैठक चालली. अखेर ऐनवेळच्या विषयाची यादी लांबत चालल्यामुळे ही बैठक संस्थगित करून ती निवडणूक झाल्यानंतर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, पेट उत्तीर्ण विद्यार्थी संशोधनापासून वंचित राहू नये म्हणून ‘गाईड’ साठी नियमात सुचविण्यात आलेल्या सुधारणेस मंजुरी देण्यात आली. त्यामुळे अध्यापनाचा ४ वर्षांचा अनुभव असलेल्या महाविद्यालयीन पीएच. डी. धारक प्राध्यापकाला आता ‘गाईडशिप’ मिळणार आहे. याशिवाय दुसऱ्या विद्यापीठातील गाईड अथवा तज्ज्ञ व्यक्तीला या विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी गाईडशिप घेता येईल. त्यांना अवघ्या २ विद्यार्थ्यांनाच संशोधनासाठी मार्गदर्शन करण्याची मुभा या बैठकीत देण्यात आली. आपल्या विद्यापीठातील गाईडसाठी संशोधक विद्यार्थ्यांचा ८ चा कोटाआहे. या बैठकीत कान्हेरे समितीच्या शिफारशी लागू केल्या जात नाहीत, या मुद्यावरून खडाजंगी झाली. डॉ. भागवत कटारे यांनी दिलेला क्रीडा संयोजन समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा बैठकीसमोर आला असता तो फेटाळण्यात आला.कुलगुरूंनी डॉ. कटारे यांचे मन वळवावे, असे या बैठकीत ठरले.शिवाय संगणक व माहिती तंत्र विभागप्रमुख डॉ. रत्नदीप देशमुख यांचा व्यवस्थापन समिती सदस्यपदाचा राजीनामा स्वीकारण्यात आला. त्यांच्या जागेवर आता डॉ. देवानंद शिंदे यांची वर्णी लावण्यात आली आहे. २०१५-१६ च्या बृहत आराखड्यास या बैठकीत मान्यता देण्यातआली. ‘पेट’धारकांना संशोधनासाठी आता प्रतीक्षेची गरज नाहीव्यवस्थापन परिषदेसमोर ‘गाईड’च्या नियमांमध्ये सुधारणा केलेला ठराव चर्चेला आला. त्यावेळी कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे यांनी भूमिका स्पष्ट केली ती अशी की, यापुढे पीएच. डी. पूर्व परीक्षा अर्थात ‘पेट’ एकदा दिल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्याला ती पुन्हा देण्याची गरज नसावी. एकदा ‘पेट’ उत्तीर्ण झाला की, तो संशोधन करण्यासाठी (पीएच.डी.) पात्र समजलाजावा. विद्यार्थ्याला जेव्हा गाईड मिळेल तेव्हा तो संशोधनाला सुरुवात करू शकतो.सध्या प्रचलित नियमानुसार पीएच. डी. धारक महाविद्यालयीन प्राध्यापकाला ५ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असला तर तो गाईडसाठी पात्र ठरतो. यापुढे अशा प्राध्यापकांना गाईडशिप मिळण्यासाठी आता ४ वर्षांचा अनुभव ग्राह्य धरला जाईल.विद्यापीठातील पीएच. डी. धारक प्राध्यापकांसाठी ३ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव गाईडसाठी पात्र समजला जाईल.या सुधारित नियमामुळे गाईडची संख्या वाढणार असून ‘पेट’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही.
पीएच.डी. गाईडसाठी सुधारित नियम मंजूर
By admin | Updated: September 27, 2014 00:55 IST