शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंप चालणार एकाच शिफ्टमध्ये

By admin | Updated: May 11, 2017 23:43 IST

लातूर : पेट्रोल, डिझेलचे कमिशन वाढवून मिळावे, या मागणीसाठी १४ मे पासून पेट्रोलपंप एकाच शिफ्टमध्ये चालविण्याचा निर्णय लातूर जिल्हा पेट्रोल व डिझेल डिलर्स असोसिएशनने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : पेट्रोल, डिझेलचे कमिशन वाढवून मिळावे, या मागणीसाठी १४ मे पासून पेट्रोलपंप एकाच शिफ्टमध्ये चालविण्याचा निर्णय लातूर जिल्हा पेट्रोल व डिझेल डिलर्स असोसिएशनने घेतला आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनही देण्यात आले आहे. १५ मे पासून सकाळी ९ ते सायंकाळी ६ याच वेळेत पेट्रोलपंप सुरू राहणार आहेत. त्यामुळे वाहनधारकांना सायंकाळनंतर पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही.२०११ मध्ये अपूर्वा चंद्रा कमिटीद्वारे केंद्र शासनाने तेल कंपन्यांना पंप चालविण्यासाठी आवश्यक खर्च किती असावा, त्यास दर सहा महिन्यांनी महागाई निर्देशांकानुसार वाढ देण्याचे लेखी आदेश दिले आहेत, असे असतानाही गेल्या चार वर्षांपासून तेल कंपन्यांनी त्याचे पालन केले नाही. त्यामुळे पंप चालकांना मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याचे लातूर जिल्हा पेट्रोल व डिझेल डिलर्स असोसिएशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही तेल कंपन्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने नोव्हेंबर २०१६ मध्ये देशपातळीवर आंदोलन केले होते. या आंदोलनातून तेल कंपन्यांनी ४ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र शासनाच्या अपूर्वा चंद्रा कमिटीच्या निर्देशानुसार पंप चालविण्यासाठी खर्चाचा परतावा १ जानेवारी २०१७ पासून देण्याबाबतचा लेखी करार तेल कंपन्यांनी फामपेडा या राज्य संघटनेसोबत केला होता. या करारातील तीन महिने संपूनही अद्याप तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून सदर कराराची अंमलबजावणी होत नसल्याने राज्य संघटनेने पंप चालविण्याचा खर्च कमी करण्यासाठी एका शिफ्टमध्ये पंप चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील सर्वच पेट्रोल पंपांवर एका शिफ्टमध्ये पेट्रोल व डिझेल मिळणार असून वाहनधारकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.