शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

पेट्रोल दराचा भडका आणि मापातही ‘पाप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:09 IST

शहरामध्ये पेट्रोलपंपावर मापात पाप करून ग्राहकांची लूट करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, शिवाजीनगर येथील पंपावरील ‘मापातील लुटी’चा प्रकार मंगळवारी समोर आला. अर्धा लिटरमागे सुमारे १०० मिली पेट्रोल चक्क चोरी केले जात असल्याचे लक्षात आल्यावर संतप्त नागरिकांनी पंपावर गोंधळ घालून जवाहरनगर पोलीस ठाणे आणि पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली.

ठळक मुद्देऔरंगाबाद येथील पंपाविरोधात तक्रार : अर्धा लिटरमागे १०० मिलीची चोरी; पोलिसांनी केला पंप बंद

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरामध्ये पेट्रोलपंपावर मापात पाप करून ग्राहकांची लूट करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, शिवाजीनगर येथील पंपावरील ‘मापातील लुटी’चा प्रकार मंगळवारी समोर आला. अर्धा लिटरमागे सुमारे १०० मिली पेट्रोल चक्क चोरी केले जात असल्याचे लक्षात आल्यावर संतप्त नागरिकांनी पंपावर गोंधळ घालून जवाहरनगर पोलीस ठाणे आणि पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. पाणीमिश्रित पेट्रोलच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण उघडीस आल्याने लुटीचा हा गोरखधंदा कधी बंद होणार, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.ही लूट उघडकीस आणणाºया नीरज शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांनी गारखेडा परिसरातील ‘बालाजी सर्व्हो सर्व्हिसेस’ या इंडियन आॅईल कंपनीच्या पंपावर पेट्रोल भरले. मात्र, मशीनवरील लिटर रिडिंग मीटरच्या आकड्यावरून काही तरी गडबड असल्याची त्यांना शंका आली. ‘मी जेव्हा पेट्रोल टाकले तेव्हा लिटर रिडिंग मीटरवरील आकडा शून्यावरून थेट १२ वर गेला आणि माझ्या नंतरच्या गाडीच्या वेळी मात्र तो शून्यावरून ६ वर गेला. असे कशामुळे झाले याबाबत पंपावरील कर्मचाºयाला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, असे नीरज म्हणाले.त्यांची शंका बळावली. त्यांनी मापामध्ये मोजणी करण्याची मागणी केली. त्यावर कर्मचाºयांनी केवळ पाच लिटरपर्यंत मोजणी करता येते, असे सांगितले. तोपर्यंत तेथे उपस्थित इतर नागरिकांनीसुद्धा पंप कर्मचाºयांना जाब विचारण्यास सुरुवात केली. लोकांचा रोष पाहून कर्मचाºयांनी काचेचे माप आणून ग्राहकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. लोकांनी त्याला अर्धा लिटर पेट्रोल भरण्यास सांगितले आणि काय आश्चर्य!काचेच्या त्या मापात प्रत्यक्षात केवळ ४०० मिली पेट्रोल पडले होते. अर्धा लिटरमागे १०० मिलीची चोरी होत असल्याचे लक्षात येताच लोकांचा संताप वाढला. त्यांनी पंपाच्या मालक आशा योगेश गायकवाड यांना संपर्क केला असता योगेश गायकवाड यांनी त्यांना ‘कोणाकडे जायचे ते जा,’ असे उद्धटपणाचे उत्तर दिले. पंपावर गोंधळ वाढल्याने जवाहरनगर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बी. जी. वेव्हळ तिथे पोहोचले. लोकांचा राग अनावर होत असल्याचे पाहून वेव्हळ यांनी पेट्रोलपंप बंद करण्याचे आदेश दिले आणि संतप्त नागरिकांना पंपाविरोधात रीतसर तक्रार करण्यास सांगितले. त्यानुसार नीरज शुक्ला, सचिन शहाणे, राजेंद्र माळी, मनोज मगरे, महादेव हिंगे, बलराज दाभाडे, स्वप्नील मंकावार, सुरेश पाठे, योगेश ठोंबरे, ओंकार सुरसे, वसंत शिंदे यांनी ठाण्यात आणि पुरवठा अधिकाºयांकडे तक्रार केली.आठच महिन्यांत पेट्रोल७२ वरून ८१ रुपयांवरऔरंगाबाद : पेट्रोल दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला मोठा चटका बसत असून, औरंगाबादमध्ये तर आता पेट्रोलने ८१ रुपयांपर्यंत मजल मारली आहे. शहरातील पेट्रोलच्या भावामध्ये गेल्या आठ महिन्यांत भरमसाठ वाढ झाली असून, एप्रिलपासून आकडेवारी पाहिली असता लक्षात येते की, शहरात पेट्रोल ७२ रुपयांवरून ८१ रुपयांपर्यंत गेले. एप्रिल ते कालपर्यंत पेट्रोल दरामध्ये ८.७६ रुपयांची वाढ झाली आहे.सोबत दिलेल्या आलेखावरून हे स्पष्ट होते की, गेल्या सहा महिन्यांत आॅक्टोबर महिन्यातील दिवाळीचा कालावधी सोडल्यास पेट्रोल दर वरचेवर वाढतच आहेत. एक वर्षापूर्वी शहराता पेट्रोलचे दर ७२.४२ रुपये, सहा महिन्यांपूर्वी ७४.९ रुपये, तीन महिन्यांपूर्वी ७६.८ रुपये, एका महिन्यापूर्वी ७८.५५ रुपये दर होते. असाच चढता आलेख कायम राहिल्यास औरंगाबादकरांना आणखी मोठा फटका बसू शकतो.