शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: September 28, 2014 01:04 IST

औरंगाबाद : औरंगाबाद पूर्वचे काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

औरंगाबाद : औरंगाबाद पूर्वचे काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या प्रचारानिमित्त काढण्यात आलेल्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत रोहिदास महाराज भवनाजवळ कार्यकर्त्यांनी ना. दर्डा यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. ‘राजेंद्रबाबूजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है!’ या घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. रोहिदासनगरापासून पदयात्रेला सुरुवात झाली. राजेंद्र दर्डा यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. अनेक महिलांनी त्यांना औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. हातात तिरंगी झेंडे, गळ्यात काँगे्रसचा रुमाल आणि डोक्यावर पंजाच्या टोप्या घालून शेकडो कार्यकर्ते राजेंद्र दर्डा यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. दादा कॉलनी व दत्तनगर भागात कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून राजेंद्र दर्डा यांचे स्वागत केले. ठिकठिकाणी राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेवर पुष्पवृष्टी होत असल्याने संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळच्या सत्रात रोहिदासपुरा, भवानीनगर, कैलासनगर, दत्तनगर या भागांमध्ये पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत भागातील नगरसेवक, महिला, युवक व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, कैलासनगर भागामध्ये राममंदिर परिसरातील दुर्गामाता मंडळाची आरती राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते करण्यात आली. दुपारच्या सत्रात संजयनगर भागात मोठ्या उत्साहात पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत युवकांनी एकच जल्लोष केला. राजेंद्र दर्डा यांनी घरोघरी भेट देऊन मतदारांना पंजाला मतदान करण्याचे आवाहन केले. संजयनगर भागात अनेक महिलांनी राजेंद्र दर्डा यांना औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. संजयनगर भागातील राजे संभाजी प्रतिष्ठान नवरात्रोत्सवाच्या देवीची आरती राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते झाली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांनी राजेंद्र दर्डा यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर जिन्सी भागातील जय हनुमान मंदिराच्या आवारात पदयात्रेचा समारोप झाला.आज जयभवानीनगर, इंदिरानगरात पदयात्राऔरंगाबाद पूर्वचे काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या प्रचारानिमित्त आज सकाळी ८.३० ते ११.३० यावेळेत पदयात्रा काढण्यात येणार आहे. वॉर्ड क्र. ७३ एएन-२, ८० राजीव गांधीनगर, ८१ जयभवानीनगर या भागात राजेंद्र दर्डा यांची पदयात्रा निघेल. पदयात्रेचा मार्ग असा राहील-मायानगर- भवानी पेट्रोलपंप मुख्य रस्ता मार्गे विठ्ठल मंदिर- आदर्श कॉलनी- विवेक सोसायटी- महाजन कॉलनी, सी सेक्टर- राजीव गांधीनगर, महालक्ष्मी कॉलनी- संत तुकोबानगर- जयभवानीनगर गल्ली नं. १, २, ३, ४- १३ वी स्कीम- ५-६-७-८-९-१०-११-१२-१३. सायंकाळी ४.३० ते ८ या वेळेत काढण्यात येणारी पदयात्रा- वॉर्ड क्र. ५१ इंदिरानगर दक्षिण व ५२ इंदिरानगर दक्षिण या भागात स्टार हॉटेल ते रहिमा मशीदच्या सर्व गल्ल्यांमधून जाणार आहे. पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.