शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत जलपुर्नभरणाला लोकसहभागाची जोड

By admin | Updated: May 22, 2016 00:06 IST

अंबाजोगाई : दुष्काळ हीच काम करण्यासाठीची खरी संधी आहे. आलेल्या संकटावर मात करीत असे संकट पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना आखून

अंबाजोगाई : दुष्काळ हीच काम करण्यासाठीची खरी संधी आहे. आलेल्या संकटावर मात करीत असे संकट पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना आखून निकामी जलस्रोतांना जीवनदान देण्याचे काम ‘आई’ प्रतिष्ठानच्या माध्यमातून अध्यक्ष अ‍ॅड. जयसिंग आनंदराव चव्हाण यांनी केले आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून अंबाजोगाई व परिसरात असणाऱ्या जुन्या तलवातील गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरण्यास मदत होत आहे. दोन महिन्यांपूर्वी शहर व परिसरात पाणी बचतीबाबत त्यांनी जनजागृती सुरू केली. लोकसहभागातून जलसंकटावर ठोस उपाययोजना आखण्यासाठी परिसरातील जलस्रोतांना पुनरुज्जीवन कसे मिळेल? यासाठी त्यांनी काम सुरू केले. शहरातील जोगाईवाडी तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठलेला आहे. गाळ काढल्यास साठवण क्षमता वाढण्यास मदत होईल, या उद्देशाने मानवलोकच्या सहकार्याने आई प्रतिष्ठानने गाळ काढणीला सुुरुवात केली. आजतागायत १० हजार ट्रॅक्टर गाळ निघाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निघालेला गाळ शेतकऱ्यांना देण्यात आल्याने जमिनीही सुपीक बनण्यास मदत होणार आहे. जोगाईवाडी तलावापाठोपाठ काळवटी साठवण तलावातील गाळ काढणीचे काम सुरू आहे. आजपर्यंत काळवटी तलावातून ५०० ट्रॅक्टर गाळ निघाला आहे.मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने ‘बडा तालाब’ निकामी होत चालला होता. या तलावातूनही ७०० ट्रॅक्टर गाळ निघाला आहे. धनेगाव येथील मांजरा धरणातून गाळ काढण्यासाठी मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास लोहिया यांनी पुढाकार घेतला आहे. मानवलोकच्या मदतीला आई प्रतिष्ठानचे सहकार्य लाभत आहे. (वार्ताहर)