शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यांना रुचेना भीम अ‍ॅप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:24 IST

गेल्यावर्षी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर रोकडरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी भारत सरकारने मोठ्या थाटामाटात सुरू केलेल्या ‘भीम’ या आॅनलाइन पेमेंट अ‍ॅपला सामान्यांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गेल्यावर्षी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर रोकडरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी भारत सरकारने मोठ्या थाटामाटात सुरू केलेल्या ‘भीम’ या आॅनलाइन पेमेंट अ‍ॅपला सामान्यांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. शहरातील व्यावसायिक, दुकानदार, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक यांच्याशी चर्चा केली असता भीम अ‍ॅपच्या वापरासंबंधी त्यांच्यामध्ये उदासीनता दिसून आली.चर्चा केलेल्या सुमारे ७० लोकांनी अ‍ॅपच्या तांत्रिक बाबतीत सर्वाधिक तक्रारी व्यक्त केल्या. सर्व्हर कनेक्शन एरर, बँक पेअरिंग न होणे, एसएमस व्हेरिफिकेशन प्रक्रिया किचकट आणि खर्चिक, लॉग इन करताना एरर येणे, अशा विविध तक्रारींमुळे ५५ टक्के लोकांनी ‘भीम अ‍ॅप’ अनइन्स्टॉल किंवा वापरणे बंद केल्याचे सांगितले.‘एकदा लॉग इन केल्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा लॉग इन व्हावे लागते. असे परत परत लॉग इन करावे लागत असल्यामुळे अ‍ॅप अनइन्स्टॉल केले. स्पर्धक अ‍ॅपप्रमाणे युजर फ्रेंडली नसल्यामुळेही वापरताना अनेक अडचणी येतात. सरकारचा हेतू जरी उत्तम असला तरी तांत्रिक बाबींमध्ये या अ‍ॅपमध्ये खूप सुधारणा कराव्या लागतील, असे आयटी इंजिनिअर अमोल भालेराव यांनी सांगितले.‘नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन आॅफ इंडिया’तर्फे (एनपीसीआय) भारत इंटरफेस फॉर मनी (भीम) अ‍ॅप तयार करण्यात आलेले आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर त्याचे उद्घाटन केले होते. अगदी साध्या फोनवरून केवळ अंगठ्याच्या ठशाद्वारे पैशांची देवाण-घेवाण करण्याची सुविधा यातून देण्यात आली. विनाइंटरनेटदेखील सामान्यांच्या सोयीचे व ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेंतर्गत टाकलेले क्रांतिपूर्ण पाऊल, असा या अ‍ॅपचा प्रचार केला गेला.सुरुवातीला अँड्राइड स्मार्टफोनवर उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर ते कमी वेळात सर्वाधिक डाऊनलोड होणारे अ‍ॅप ठरले. आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी ते डाऊनलोड केलेले आहे. अ‍ॅप लाँच झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स विके्रते एम. नाझीर यांनीही ते डाऊनलोड केले; परंतु ग्राहकांकडून त्याला प्रतिसाद न लाभल्याने त्यांनी भीम अ‍ॅप अनइन्स्टॉल केले. अ‍ॅपची जेवढी चर्चा झाली तेवढा त्याचा वापर झाला नसल्याने दुकानदारांनी सांगितले.नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यात आघाडीवर राहणाºया तरुणांनाही ‘भीम’बद्दल विशेष आकर्षण नसल्याचे दिसून आले. त्यांचा कल इतर आॅनलाइन पेमेंट सुविधांकडे अधिक आहे. आकर्षक आॅफर्स आणि वापरायला एकदम सोपे यामुळे तरुणाईची त्यांना पसंती मिळते. त्या तुलनेत भीम अ‍ॅपचा युजर फे्रंडली नसल्याचे ७५ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले.सरकारचे ‘कॅशलेस’ धोरण प्रशंसनीयच आहे. डेबिट किंवा क्रे डिट कार्डद्वारे पैशांची देवाणघेवाण केल्यास ०.७५ ते १.७५ टक्का अधिक अधिभार आकारला जातो. त्यामुळे भीम अ‍ॅपसारखी सुविधा असणे गरजेचे असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. त्याचा नीट प्रचार व लोकांमध्ये जागरूकता करायला हवी, असे ८० टक्के व्यापा-यांना वाटते.