शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

ग्राहक मंचाने ठोठावला ‘एसबीएच’ शाखेला दंड

By admin | Updated: October 29, 2014 00:58 IST

बीड : पंतप्रधान रोजगार निर्मिती अंतर्गत देण्यात आलेल्या कर्जावर स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या कृषी शाखेने कर्जदाराकडून अनुदानाच्या रकमेसह व्याज आकारणी केली

बीड : पंतप्रधान रोजगार निर्मिती अंतर्गत देण्यात आलेल्या कर्जावर स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या कृषी शाखेने कर्जदाराकडून अनुदानाच्या रकमेसह व्याज आकारणी केली. या प्रकरणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या कृषी शाखेस २५ हजार रुपये दंड व तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रासापोटी ९ हजार रुपये देण्याचे आदेशित केले आहे़बीड येथील के.ए. सानप यांना जिल्हा ग्राम उद्योग मंडळाने पंतप्रधान रोजगार निर्मिती अंतर्गत योजना मंजूर केली होती़ सानप यांना या योजनेर्तंगत ९ लाख रुपये कर्ज मंजूर केले होते. सानप यांनी स्वत: पाच टक्के म्हणजे ४५ हजार रुपये तर उद्योग मंडळाने ३५ टक्के अनुदान रक्कम ३ लाख १५ हजार रुपये असे एकूण ३ लाख ६० हजार रुपये स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या शाखेत जमा केले होते. उर्तवरीत रक्कम ६० टक्के रक्कम ५ लाख ४० हजार रुपये स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या कृषी शाखेने दिली होती. बँकेने ६० रकमेवर कर्ज आकारणी केली. वारंवार विनंती करुनही ९५ टक्के रकमेवर व्याज लावल्याची तक्रार सानप यांनी ग्राहक मंचात दिली. बँकेने आपली बाजु मांडत सांगितले की, कर्जदार व अनुदानाची ४० टक्के रक्कम जमा झाली होती. ९५ टक्के रकमेवर व्याज घेतले हे अमान्य असून २४ एप्रिल रोजी सानप यांच्या खात्यावर तक्रार प्राप्त होताच १ लाख ५४ हजार रुपये जमा केले होते.दोन्ही पक्षाचा युक्तीवाद जिल्हा ग्राहक तक्रार निवार मंचाच्या सदस्या मंजूषा चितलांगे, रवींद्र राठोडकर, विनायक लोंढे यांनी ऐकून घेतला. त्यावर सुनावणी करत, बीड शहरातील नगर रोड वरील स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या कृषी शाखेस २५ हजार रुपये दंड व तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रासापोटी ९ हजार रुपये देण्याचे आदेशित केले. तक्रारदार सानप यांच्यावतीने अ‍ॅड. अविनाश गंडले यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)