शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
2
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
3
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
4
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
5
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
6
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
7
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
8
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
9
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
10
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
11
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
12
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
13
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
14
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
15
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
16
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
17
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
18
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
19
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
20
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?

‘पेन किलर’ चे कार्य करते हास्य !

By admin | Updated: October 20, 2016 01:42 IST

औरंगाबाद : जुना अल्बम पाहताना आपण ज्या फोटोत हसलो होतो, तोच फोटो पाहणे आपण पसंत करतो. जर पाच सेकंदांसाठी केलेल्या हास्यामुळे आपला

औरंगाबाद : जुना अल्बम पाहताना आपण ज्या फोटोत हसलो होतो, तोच फोटो पाहणे आपण पसंत करतो. जर पाच सेकंदांसाठी केलेल्या हास्यामुळे आपला एखादा फोटो सुंदर येत असेल तर उभ्या आयुष्याचाच फोटो सुंदर करण्यासाठी निश्चितच खळखळून हसले पाहिजे, असे मत विनोदी कलाकार मकरंद टिल्लू यांनी व्यक्त केले. जैनम महिला मंचतर्फे महावीर भवन येथे आयोजित ‘हास्यकल्लोळ’ कार्यक्रमात ते बोलत होते. हसण्यामुळे शरीराला होणारे फायदे टिल्लू यांनी शास्त्रीय दाखले देऊन पटवून दिले. हसल्यामुळे मन प्रसन्न, आनंददायी राहते आणि हाच आनंद आपल्यामध्ये नवा आत्मविश्वास जागवतो. हसण्याचे फायदे पटवून देताना ते म्हणाले की, हसण्यामुळे श्वसनसंस्था मोकळी होते, रक्तवाहिन्या रुंदावतात, पोटाची हालचाल होऊन पचनसंस्थेचा व्यायाम होतो. तसेच मेंदूला आॅक्सिजनचा पुरवठा होतो. हसण्यासाठी जगा आणि जगण्यासाठी हसा, असा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाला पू. कमलमुनीजी कमलेश म. सा., पू. घनश्याम मुनी म. सा., पू. कौशलमुनी म. सा., पू. अरिहंत मुनी म. सा. आदींची प्रमुख उपस्थिती होती. भारती बागरेचा, कविता अजमेरा, करुणा साहुजी, मंगला गोसावी, मंगल पारख, सरोज काला, सुषमा साहुजी आदींची विशेष उपस्थिती होती. मंदा वायकोस व लता अन्नदाते यांनी मंगलाचरण सादर केले. मनीषा भन्साळी, मधू छाजेड, प्रेमा भन्साळी यांचे कार्यक्रमाच्या आयोजनात विशेष सहकार्य लाभले. भावना सेठीया यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. विद्या खिंवसरा, नंदा मुथा, कमला ओस्तवाल आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.