शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

हलगर्जीपणाचा कळस

By admin | Updated: June 13, 2017 00:56 IST

बीड : बिंदुसरा नदीवरील पूलावरून वाहतूक बंद केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बिंदुसरा नदीवरील पूलावरून वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे सोलापूर, लातूरकडे जाणारी जडवाहने बीड येथील शिवाजी चौकातून नगर रोड, नायगाव, रोहतवाडी, शंभरचिरा, पाटोदा, लिंबागणेश, मांजरसुंबा मार्गे जाणार आहेत. तर बीडकडे येणारी वाहने मांजरसुंबा, बार्शी नाका, तेलगाव नाका, नाळवंडी नाका, खंडेश्वरी मंदिर, एमआयडीसी, मन्सुरशहा दर्गा रस्ता, मसरत नगर, जालना रोडमार्गे येतील. त्यामुळे आधीच खराब असलेले शहरातील अंतर्गत रस्ते आणखी खराब होणार आहेत. जुना मोंढा, मन्सूर शाह दर्गा ते रामतीर्थपर्यंत रस्त्याची वाट लागलेली आहे. पर्यायी मार्ग नसल्याने आता पुन्हा या रस्त्यावरून जड वाहतूक होणार आहे. त्यातच हा रस्ता अरुंद असल्याने मोंढा भागात येणारी जड वाहने तसेच इतर वाहतुकीमुळे सोमवारपासूनच दर दहा मिनिटाला ट्रॅफिक जामचा अनुभव येत असून वेळेचा अपव्यय होत आहे. तसेच मांजरसुबा ते पाटोदा रस्त्याची दुरवस्था कायम आहे. जड वाहतुकीमुळे रस्ते आणखी खराब होणार आहेत.वाहनधारकांना फटकामांजरसुंबा ते बीड २० किलोमीटर अंतर आहे. परंतु आता वाहनधारकांना ५० किलोमीटरचा जादा प्रवास करावा लागणार असून वेळेसह आर्थिक फटका बसणार आहे. एसटीतील प्रवाशांनाही प्रवासासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. बायपासचा प्रश्न मार्गी लावला असता, तर...महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने बिंदुसरा नदीवरील पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष झाले. पात्रातून केलेला पूल कायमस्वरुपी टिकणार नव्हता. ही बाब लक्षात घेऊन बायपास रस्त्याचे काम वेगात करून वापरात आणणे गरजेचे होते. परंतु, प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले.