संजय लव्हाडे ,जालनापाऊस नसल्यामुळे बाजारात बहुतांश मालाला उठाव नाही. त्याचप्रमाणे धान्य मालाची आवकही थंडावली आहे. रमजान इदनंतर खोबऱ्यामध्ये तेजी आली. ज्वारी, बाजरी, तूर, उडीद, उडीद डाळ, तूर डाळ, शेंगदाणा आणि साबूदाणा या वस्तूमालांचे भाव वधारले आहेत.या जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सर्वसामान्य शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे हैराण आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी दुष्काळाने, गेल्यावर्षी गारपीटीने जिल्ह्यास मोठा तडाका दिला. यावर्षी अल्पशा पावसामुळे सर्वसामान्य शेतकरी हैराण झाले आहेत. विशेषत: या जिल्ह्यातील खरीपपाठोपाठ रबी हंगामही धोक्यात आला आहे. यावर्षी मूग, उडीद व तूर आदी डाळीची आवक मोठ्या प्रमाणात घटणार, हे स्पष्ट आहे. कारण मूग आणि उडीदाचे क्षेत्र पूर्णत: घटले आहे. परिणामी उत्पादनात सुध्दा मोठ्या प्रमाणात घसरण होणार, हे निश्चित आहे. त्यामुळेच भविष्यात मूग आणि उडीदाचे भाव गगनाला भिडणार, असेच चित्र आहे. येथील धान्य बाजारासह मोंढ्यात उत्पादनातील कमतरता आणि वाढत्या मागणीमुळे रमजान ईदनंतर खोबऱ्याच्या दरात क्ंिवटलमागे तीन हजार रुपयांची तेजी आली. खोबऱ्याच्या आजपर्यंतच्या इतिहासातील ही विक्रमी तेजी मानली जाते. आगामी काळातील वाढती मागणी लक्षात घेऊन बऱ्याच मोठ्या व्यापाऱ्यांनी खोबऱ्याचा स्टॉक करुन ठेवल्याचे बोलले जाते. त्यामुळेही खोबऱ्यात ही मोठी तेजी आली असावी, असा अंदाज आहे. सध्या खोबऱ्याचे दर २० हजार रुपये प्रतिक्ंिवटल असे आहेत. दिवाळीपर्यंत खोबऱ्याच्या दरात आणखी तेजी येण्याची शक्यता आहे.ज्वारीची आवक दररोज ५० पोते इतकी असून शाळू ज्वारीत २०० रुपयांची तेजी आल्यानंतर भाव १३०० ते ३२०० रुपये प्रतिक्ंिवटल असे झाले. बाजरी आणि तुरीची आवक प्रत्येकी पन्नास पोते इतकी आहे. बाजरीचे भाव ११०० ते १६०० आणि तुरीचे भाव ४००० ते ४८०० रुपये प्रतिक्ंिवटल असे आहेत. उडदाची अवक नसल्यातच जमा आहे. उडदाच्या दरात ५०० रुपयांची तेजी असून भाव ४००० ते ५५०० रुपये प्रतिक्ंिवटल असे आहेत. हरभरा आणि सोयाबीनची आवक प्रत्येकी शंभर पोते असून भाव स्थिर (हरभरा-२०० ते २७०० आणि सोयाबीन ३८०० ते ४०००) आहेत.तूरडाळ आणि उडद डाळीच्या दरात प्रत्येकी २०० रुपयांची तेजी आली. तूरडाळीचे भाव ६५०० ते ७२०० आणि उडद डाळीचे भाव ७५०० ते ८००० रुपये प्रतिक्ंिवटल असे आहेत.शेंगदाणा आणि साबुदाण्याच्या दरात प्रत्येकी दोनशे रुपयांची तेजी आली. शेंगदाणा ६००० ते ६५०० आणि साबूदाण्याचे भाव ७००० ते ७७०० रुपये प्रतिक्ंिवटल असे आहेत.
शेंगदाणा, साबुदाणाही महागला!
By admin | Updated: August 6, 2014 02:14 IST