शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

आडूळजवळ अपघात झालेल्या ट्रकमधून बिअर पळवत तळीराम झाले झिंगाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 15:27 IST

धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आडूळनजीक बिअरचा ट्रक पलटून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे.

औरंगाबाद : धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आडूळनजीक बिअरचा ट्रक पलटून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती समजताच आजूबाजूच्या भागातील तळीरामांनी ट्रकमधील बिअरचे बॉक्स पळवले आणि रस्त्यालगतच्या शेतातच बिअर पिऊन झिंगाट झाले.

या बाबत अधिक माहिती अशी कि, आज पहाटे भोपाळहून बिअर घेऊन एक ट्रक केरळला जात होता. धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडूळजवळ पांढरी पिंपळगाव येथे येताच चालकाला डुलकी लागल्याने ट्रक रस्त्यालगत पलटी झाला. यात चालक व क्लीनर दोघे जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहिती नुसार ट्रकमध्ये २५ लाखाची बिअर होती.

पहा व्हिडिओ : धुळे- सोलापूर महामार्गावरील बिअरचा ट्रक उलटला, लोकांनी बिअरचे बॉक्स पळविले

'ड्राय डे' च्या दिवशी तळीरामांची झाली पार्टीबिअरच्या ट्रकला अपघात झाल्याची माहिती आजूबाजूच्या भागात पसरताच अनेक तळीरामांनी अपघातस्थळी मोर्चा वळवला. घटनास्थळी बिअरची बॉक्स ट्रक बाहेर पडल्याचे दिसताच तळीरामांनी ती पळवण्यास सुरुवात केली. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलिस घटनास्थळी आले. यानंतरच बिअर पळविणे बंद झाले. परंतु; पोलीस येईपर्यंत शेकडो बाटल्या लोकांनी पळविल्या होत्या. काहीजण तर पोलिसांच्या धाकाने गुपचूप शेतात लपूनछपून बिअर पिऊन झिंगाट झाले होते. यामुळे आज असलेल्या 'ड्राय डे' च्या दिवशी तळीरामांची चांगलीच पार्टी झाल्याची चर्चा परिसरात रंगली होती.