सुनील किर्दक ल्ल गुरूमुळेच कनिष्ठ अभियंता ते उद्योजकतेची भरारी...‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू: गुरुर्देवो महेश्वर:।गुरु: साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेनम:।।’गुरूमुळेच कनिष्ठ अभियंतापदापासून यशस्वी उद्योजक होण्याचा मान मला मिळाला असून, जिद्द आणि चिकाटीने केलेल्या कामात आनंद मिळतो हे कोणीही डावलू शकत नाही.आपल्या जीवनाची जडण-घडण माता-पिता, शिक्षक, शाळा आणि मित्रांवर अवलंबून असते, असा माझा ठाम विश्वास असून, मला जीवनाच्या विविध टप्प्यांवर संस्कार करणारे गुरू लाभले. विद्यार्थिदशेत शिक्षकरूपी वडील मिळाले. त्यांच्यामुळे मी अभियंता झालो, तर उद्योग क्षेत्रात श्रीकांत बडवे यांच्या कारखान्यात ३,५०० रुपयांवर मला नोकरी मिळाली. जीवाचे रान करून सांगितलेली जबाबदारी पार पाडली. जीवनात जर चांगले मार्गदर्शक असतील तर जडणघडणही चांगलीच होते. बीड जिल्ह्यातील आडस गावात माझा जन्म झाला असला तरी आता औरंगाबादेत गुरूच्या रूपाने बडवे मिळाले अन् स्वत:च्या उद्योगाची मुहूर्तमेढ त्यांच्यामुळेच रोवली गेली. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला यशस्वी उद्योजकाचे शिखर गाठता आले. एवढेच नव्हे तर दोनदा ‘राष्ट्रीय पुरस्कार विजेता उद्योजक’ हा प्रवास शक्य झाला. हे श्रेय माझ्या गुरूलाच जाते. हे विसरता येणार नाही. उद्योगात श्रीकांत बडवे, तर गतवर्षी आध्यात्मिक गुरू म्हणून संत भय्यूजी महाराज यांना गुरू केले आहे.यशस्वी शिखर गाठताना कितीही चुका झाल्या तरी चालेल ‘कोशिश करणेवाले की हार नही होती’ हे शब्द योग्य ठरतात. चांगला समाजसेवक होण्यासाठी सतत धडपड सुरू असून, गुरूची पे्ररणा उत्साह वाढविण्याचे काम करते.
यशस्वीतेच्या शिखराकडे
By admin | Updated: July 12, 2014 00:58 IST