माहोरा : जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे एका घराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी १ लाख रोख व ८१ हजारांचे दागिने असा ऐवज लंपास केला. ही घटना ३ जून रोजी पहाटे ४.३० च्या सुमारास घडली.दादाराव पांडुरंग जंजाळ हे कुटुंबियांसह गच्चीवर झोपायला गेले होते. हीच संधी सााधत अज्ञात चोरट्यांनी जंजाळ यांच्या घराचा कोंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील वरील ऐवज घेऊन चोरटे तेथून पसार झाले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर जंजाळ यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना बोलावून तपासणी केली. मात्र चोरट्यांचा मागोवा लागला नाही. पोलिस निरीक्षक देशपांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धाडगे, प्रकाश कणखर करत आहे. (वार्ताहर)
पावणेदोन लाखांची घरफोडी
By admin | Updated: June 6, 2014 01:06 IST