शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘पाटोदा पॅटर्न’ आता मध्यप्रदेशातही राबविणार

By admin | Updated: June 11, 2014 00:52 IST

वाळूज महानगर : राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पाटोदा गावाला आज मध्यप्रदेशच्या निर्मल भारत पथकाने भेट देऊन पाहणी केली.

वाळूज महानगर : राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पाटोदा गावाला आज मध्यप्रदेशच्या निर्मल भारत पथकाने भेट देऊन पाहणी केली. पथकाने गावातील विकासकामे पाहून हा पाटोदा पॅटर्न मध्यप्रदेशात राबविण्याचा संकल्प केला.स्वच्छता अभियानात पाटोदा गावाने राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला असून, लोकसहभागातून गावात विविध विकासकामे करण्यात आली आहेत. नियमित कर भरणाऱ्यांना मोफत दळण, आगाऊ कर भरणाऱ्यांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप, शालेय विद्यार्थ्यांना मोफत दूध, गरोदर मातांसाठी मदर केअर सेंटर, गावात शुद्ध पाणीपुरवठा, सौर ऊर्जेचे दिवे, आयएसओ ग्रामपंचायत व अंगणवाड्या, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन आदी उपक्रम यशस्वीरीत्या राबवून अल्पावधीत गावाचा चेहरा बदलून गेला आहे. या गावाने राबविलेल्या मोफत दळणाची चर्चा राज्यभर पसरल्यामुळे या गावाचे अनुकरण प्रत्येक गावाने करण्याचे आवाहन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी केले होते. राज्य शासनाचे जवळपास सर्वच पुरस्कार या गावाला मिळाले आहेत. मध्यप्रदेशच्या ‘निर्मल भारत’ पथकात भोपाळ जिल्हा परिषदेचे उपायुक्त अशोक निम, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.आर. मीना, गौतम महतो, मनेश जैन, शैलेश मुजुमदार आदींसह ४३ सदस्य होते. पथकाने ग्रामस्थांशी संवादही साधला. पाटोदा खेडेगाव असूनही येथे शहराला लाजवेल अशा सुविधा मिळत असल्याचे पाहून पथक भारावले. पाटोदा पॅटर्न मध्यप्रदेशात राबविण्याचा मनोदय अशोक निम यांनी बोलून दाखविला. मध्यप्रदेशात निर्मल भारत अभियान यशस्वीरीत्या राबविण्यासाठी आदर्श पाटोदा गावचे माजी सरपंच भास्कर पा. पेरे यांना मध्यप्रदेशात आमंत्रित करण्यात आले आहे. प्रारंभी, पथकातील सदस्यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. यावेळी माजी सरपंच भास्कर पा. पेरे, ग्रामविकास अधिकारी आर.डी. चौधरी, स्वच्छता अभियानच्या जिल्हा समन्वयक वैशाली जगताप, तालुका समन्वयक ए.ए. पठाण, पी.पी. भुईगळ, सुनील मातकर, सखाहरी पेरे, आबासाहेब लोखंडे, सोमनाथ पेरे, अप्पासाहेब पेरे, भाऊसाहेब मरक, दिलीप भालेराव, दीपाली पेरे व ग्रामस्थ उपस्थितहोते.