शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

भाजप तालुकाध्यक्षपदी पाटील

By admin | Updated: March 28, 2016 00:13 IST

कळंब : भाजपच्या कळंब तालुकाध्यक्षपदी प्रा. दिलीप पांडुरंगराव पाटील यांची निवड झाली. पक्षातील सर्व जुन्या इच्छुकांना टाळून राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपावासी झालेल्या

कळंब : भाजपच्या कळंब तालुकाध्यक्षपदी प्रा. दिलीप पांडुरंगराव पाटील यांची निवड झाली. पक्षातील सर्व जुन्या इच्छुकांना टाळून राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपावासी झालेल्या प्रा. पाटील यांच्या खांद्यावर पक्ष नेतृत्वाने ही जबाबदारी टाकली आहे.तालुकाध्यक्षाची निवड मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला होता. इच्छुकांची संख्या जास्त झाल्याने व अनेकांनी या पदासाठी दावेदारी केल्याने निवडीचा विषय लांबणीवर पडला होता. रविवारी येथील शासकीय विश्रामगृहात पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, संताजी चालुक्य, अ‍ॅड. खंडेराव चौरे, उमेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी इच्छुकांची संख्याही अचानक वाढल्याने पक्षश्रेष्ठींसमोर तालुकाध्यक्षपद निवडीचा पेच वाढला होता. प्रत्येकाशी चर्चा करून तसेच स्थानिक कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून जिल्हाध्यक्ष कुलकर्णी यांनी प्रा. पाटील यांची तालुकाध्यक्षपदी निवड जाहीर केली. प्रा. पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये संजय पाटील दुधगावकर यांच्यासोबत भाजपत प्रवेश केला होता. जिल्हा बँक निवडणुकीत दुधगावकर यांच्याशी मतभेद झाल्याने प्रा. पाटील हे तत्कालीन जिल्हाध्यक्ष नितीन काळे गटामध्ये सहभागी झाले होते. तालुकाध्यक्ष पदासाठी प्रा. पाटील यांची वर्णी लागावी यासाठी काळे यांनीच पक्षाकडे जोरदार फिल्डींग लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (वार्ताहर)