भूम : येथील कृषिउत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे संजय पाटील तर उपसभापतीपदी जयसिंग गोफणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे़ निवडीनंतर समर्थक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला़भूम कृउबाची जवळपास २५ वर्षानंतर पंचवार्षिक निवडणूक झाली़ या निवडणकीत राष्ट्रवादी विरोधात सेना, भाजपा, काँग्रेस यांनी विकास पॅनल उभा केला होता. परंतु राष्ट्रवादीने १७ पैकी १५ जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली होती. समितीच्या सभापती व उपसभापतीसाठी युवा चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता वर्तविली जात होती़ त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी पिठासन अधिकारी ए़टी़सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली बैैठक घेण्यात आली़ राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय वसंतराव पाटील यांचा सभापतीपदासाठी तर उपसभापतीपदासाठी जयसिंग गोफणे यांचा एकमेव अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडी जाहीर होताच बाजार समितीच्या आवारात फटाक्यांची आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी संजय पाटील व उपसभापती जयसिंग गोफणे यांचा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत पाटुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजी खरेदी विक्री संघाचे चेअरमन हणमंत नाईकवाडी, फेडरेशन संचालक गौरीशंकर साठे, वसंतराव पाटील, संचालक भगवान पाटील, रमेश मस्कर, नागरगोजे, युवराज तांबे, अशोक वनवे पाटील, राजेंद्र गाढव, अशोक नलवडे, प्रवीण खटाळ, राहुल पाटील, खैरे आबा, बालाजी माळी, प्रतिकसिंह पाटील यांच्यासह संचालक रोहन जाधव आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाजार समितीचे प्रशासक के. एस. बारकूल, दाभोळकर, सतीश भोळे, प्रवीण देवरे आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)
कृउबाच्या सभापतीपदी पाटील
By admin | Updated: May 23, 2016 23:56 IST