शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांनी स्थानक सोडून घेतला चिंंचेचा आधार

By admin | Updated: March 31, 2017 00:17 IST

भोकरदन : तालुक्यात गत आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे.

भोकरदन : तालुक्यात गत आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. यामुळे नेहमी बसची वाट पहात बसस्थानकात बसणाऱ्या प्रवाशांनी आता स्थानक सोडुन या परिसरातील चिंंचेच्या झाडाचा आधार घेतल्याचे चित्र आहे.तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सूर्य अक्षरश: आग ओकत असल्यामुळे सकाळी १० वाजे पासूनच उन्हाची तीव्रता वाढत आहे. उन्हाचा पारा हा ४० अंशांवर पोहचला आहे. त्यामुळे दुपारी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नेहमी नागरिकांनी गजबजले असणारे रस्ते दुपारच्या वेळी सामसुम झाल्याचे दिसत आहे. तर भोकरदन येथील बसस्थानकातून भोकरदन ते जालना, भोकरदन - औरगांबाद, भोकरदन - सिल्लोड, भोकरदन - जाफराबादसह तालुक्यातील पारध, पिंपळगाव रेणुकाई, वालसांवगी, हसनाबाद, तळेगाव, सिपोरा बजार, केदारखेडा या गावातुन तालुक्याच्या ठिकाणी बसने प्रवास करणाऱ्या संख्या सुध्दा लक्षणीय आहे शिवाय संध्या साखरपुडा, विवाह, या कार्यक्रमासाठी कापड खरेदी, सोने खरेदी करणाऱ्याची गर्दी शहारात येत आहे. त्यामुळे शहरातील स्थानकात नियमित चारशे ते पाचशे प्रवसी बसच्या प्रतीक्षेत थांबलेले आसतात. मात्र गेल्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे बसस्टँडमध्ये बसणे प्रवाशांना अडचणींचे होऊ लागले आहे. त्यामुळे या बसस्थानक परिसरामध्ये असलेल्या चिंच व लिबांच्या झाडाखाली प्रवाशांची गर्दी झालेली दिसते. या ठिकाणी सावली व मोकळी हवा यामुळे उन्हाची तीव्रता कमी जाणवते.त्यामुळे शहरातील या बसस्टॅड मध्ये दुपारच्या वेळी प्रवासी रहात नाही. ते सर्व चिंचेच्या व लिंबाच्या झाडांचा आधार घेऊन बसलेले असतात़ या ठिकाणी पाणपोई असल्यामुळे प्रवाशाना पिण्याच्या पाण्याची सुध्दा सुविधा उपलब्ध झालेली आहे़ (वार्ताहर)