शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बसस्थानकासमोरून प्रवासी पळविणे सुरूच

By admin | Updated: January 14, 2017 00:17 IST

तुळजापूर : जिल्ह्यात सध्या सर्वत्र रस्ता सुरक्षितता सप्ताह साजरा केला जात आहे़

तुळजापूर : जिल्ह्यात सध्या सर्वत्र रस्ता सुरक्षितता सप्ताह साजरा केला जात आहे़ अपघात रोखण्यासह वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत प्रशासन जनजागृती करीत आहे़ मात्र, तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील दोन्ही बसस्थानकासमोरून प्रवासी पळविण्याचा प्रकार खासगी वाहनधारकांकडून सुरूच असून, रस्त्यावरच वाहने उभा केली जात असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम असल्याचे चित्र ‘लोकमत’ प्रतिनिधीने शुक्रवारी केलेल्या पाहणीत समोर आला़राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानक परिसरात १०० ते २०० मीटर परिसरात खाजगी वाहनाद्वारे प्रवासी वाहतूक होऊन नये असे, दंडक आहेत़ असे असतानाही तुळजापूर शहरातील जुन्या बस्थानकातून व नवीन बसस्थानकासमोरून खासगी वाहनाद्वारे प्रवाशांची पळवापळवी केली जात आहे. तुळजापूर शहरातून १५० ते २०० खाजगी वाहने दररोज अवैधरीत्या प्रवाशांची वाहतूक करतात़ थेट बसस्थानकाच्या आवारातून प्रवासी नेले जात असल्याने राज्य परिवहन महामंडळाला याचा फटका बसत आहे़ शिवाय क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी व भरधाव वेगातील वाहतूक यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे़ बसस्थानकाच्या काही फूट अंतरावरून सद्यस्थितीत खासगी बास, काळी-पिवळीजीप, टमटम, ट्रॅव्हल्स या वाहनाद्वारे सोलापूर, लातूर, नळदुर्ग, उस्मानाबाद, बार्शी इ. मार्गावर प्रवासी वाहतूक केली जात आहे़ काही महिन्यांपूर्वी आगार प्रमुखांनी बसस्थानकातील प्रवासी पळविणाऱ्या वाहनचालकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते़ विशेष म्हणजे आगाराकडून पोलीस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन विभागाला पत्र देऊनही संबंधित वाहनांवर कारवाई केली जात नसल्याचे सांगण्यात आले़ दरम्यान, उस्मानाबाद, लातूर, नळदुर्ग, सोलापूर या प्रमुख मार्गावर व जुन्या बसस्थानकासमोरील भागात खासगी वाहने उभा राहत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे़ तर दुसरीकडे रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करतानाही हा प्रकार पोलीस, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या निदर्शनास येत नाहीच कसा, हा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)