शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी सेवा समितीने औरंगाबाद रेल्वेस्टेशनसाठी केलेल्या सूचना कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 18:59 IST

मॉडेल रेल्वेस्टेशनवर पाच महिन्यांपूर्वी रेल्वे बोर्डाच्या प्रवासी सेवा समितीने पाहणी करून सोयी-सुविधांविषयी सूचना केल्या; परंतु अद्यापही यातील काही सूचना कागदावरच आहेत. स्टेशनवर उघड्या ड्रेनेज चेंबरमुळे प्रवासी पडण्याची भीती समितीने अहवालात नमूद केली होती; परंतु अद्यापही चेंबरची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

औरंगाबाद : मॉडेल रेल्वेस्टेशनवर पाच महिन्यांपूर्वी रेल्वे बोर्डाच्या प्रवासी सेवा समितीने पाहणी करून सोयी-सुविधांविषयी सूचना केल्या; परंतु अद्यापही यातील काही सूचना कागदावरच आहेत. स्टेशनवर उघड्या ड्रेनेज चेंबरमुळे प्रवासी पडण्याची भीती समितीने अहवालात नमूद केली होती; परंतु अद्यापही चेंबरची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.  

प्रवासी सेवा समितीने १२ सप्टेंबर रोजी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पाहणी केली होती. समितीचे निर्मल सिन्हा, अंजू मखिजा, कैलाशनाथ शर्मा, राकेश शाह, पंकजकुमार पाठक, रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांचे सचिव लालमणी लाल यांनी ही पाहणी केली होती. रेल्वेस्टेशनवरील अस्वच्छता आणि प्रवाशांच्या असुविधांविषयी या समितीने ‘दमरे’च्या अधिकार्‍यांना धारेवर धरत चांगलेच खडेबोल सुनावले होते. 

जुन्या इमारतीसमोरील ड्रेनेज चेंबरची अवस्था पाहून सदस्य थक्क झाले होते. रेल्वेस्टेशनच्या आवारातही ठिकठिकाणी अस्वच्छता समितीने रेल्वे अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. या समितीने संपूर्ण पाहणीचा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर केला; परंतु त्यानंतरही रेल्वेस्टेशनवरील ड्रेनेज चेंबरच्या अवस्थेत सुधारणा झालेली नाही. रेल्वे अधिकार्‍यांकडून समितीच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

अहवालात नमूद काही नोंदीस्टेशनवर काही काही ठिकाणी ड्रेनेज चेंबर उघडे आहेत. त्यामुळे प्रवासी पडण्याची भीती आहे. परिसरात शौचालय नाही. त्यामुळे अस्वच्छता वाढली आहे. पाण्याच्या तोट्या कमी आहेत.स्लीपर  क्लासचे शौचालय स्वच्छ आणि मोठे आहे.मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवर एक्स्प्रेस रेल्वे थांबण्याची मागणी आहे.