शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांचा जीव टांगणीला

By admin | Updated: July 23, 2016 01:14 IST

औरंगाबाद : शहराबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर अवैध वाहतुकीने क हर केला आहे.

औरंगाबाद : शहराबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर अवैध वाहतुकीने क हर केला आहे. काळी-पिवळी, खाजगी वाहनांबरोबर छोट्या-मोठ्या मालवाहू गाड्यांमध्ये प्रवाशांना अक्षरश: कोंबून धोकादायकरीत्या वाहतूक केली जात आहे. यातून अशा अवैध वाहतूकदारांची चांदी होत आहे. प्रवाशांचा जीव मात्र टांगणीला लागत आहे.सिल्लोडहून भाविकांना घेऊन फुलंब्रीकडे जाणारा टेम्पो पुलावरून नदीपात्रात कोसळल्याची घटना बुधवारी पाथ्रीजवळ घडली. या घटनेमुळे अवैध वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.जालना रोड, हर्सूल रोड, नगर नाका, बीड बायपाससह जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर अवैध वाहतूकदारांकडून प्रवाशांची धोकादायक पद्धतीने ने-आण केली जात आहे. रस्त्यावर एखादा प्रवासी दिसत नाही की, त्याच्या भोवती अशा वाहतूकदारांचा गराडा पडतो. कमी पैशात सोडले जाईल, लहान मुलांचे कोणतेही भाडे घेत नाही, सांगेल तेथे गाडी थांबेल, या बाबींमुळे प्रवासी जिवाची पर्वा न करता अशा वाहनांतून धोकादायक प्रवास करतात. काळी-पिवळी वाहनांमध्ये कितीतरी अधिक, प्रसंगी थेट मागे दाराला लटकून प्रवाशांची वाहतूक होताना सर्रास दिसत आहे. चालकाच्या बाजूने तर तीन ते चार प्रवासी कोंबले जात आहेत. अशा परिस्थितीत गाडी चालविण्याची कसरत चालक करतो. एखादा अपघात झाल्यानंतर आरटीओ आणि पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. ‘एसटी’ला प्राधान्य द्याएस.टी.महामंडळाच्या बसगाड्यांचा प्रवास हा नेहमीच सुरक्षित आहे. शिवाय अपघात विम्याच्या रुपाने सुरक्षा कवच आहे.प्रवाशांनी ‘एसटी’तून प्रवास करण्याला प्राधान्य द्यावा,असे एस.टी.महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी एस.एस.रायलवार म्हणाले.मालवाहूंचा वापरप्रवासी वाहतुकीसाठी सर्रास लोडिंग रिक्षापासून छोट्या-मोठ्या मालवाहू वाहनांचा वापर करण्यावर सर्रास भर दिला जातो. अशा वाहनांतून प्रवास आर्थिकदृष्ट्या परवडणारा ठरतो. परंतु अनेकदा अशा वाहनांचा प्रवास जिवावर बेतणारा ठरतो. पोलिसांची कारवाई टाळून शहराबाहेर पडण्यासाठी अंतर्गत रस्त्यांचा वापर केला जात आहे. कारवाई सुरूअवैध वाहतुकीविरुद्ध १ जुलैपासून कारवाई केली जात आहे. यामध्ये अतापर्यंत अनेक वाहनांवर कारवाई केली आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहील,असे प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी सांगितले.