लातूर : इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांकडे प्रलंबित असलेली देयके तसेच पेट्रोल व डिझेल विक्रीत नफा वाढवून मिळावा, अपूर्व चंद्रा कमिटीच्या शिफारशीनुसार पंप चालकांच्या मागण्या मान्य कराव्यात, यासाठी देशभरात पेट्रोल पंप चालकांनी संप पुकारला आहे. या आंदोलनात लातूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप चालक सहभागी होणार आहेत. शुक्रवारी हॉटेल अॅम्बेसी येथे झालेल्या असोसिएशनच्या बैठकीत हा ठराव घेण्यात आला. फेडरेशन आॅफ आॅल महाराष्ट्र पेट्रोल, डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले. गेल्या अनेक वर्षांपासून पंप चालकांच्या मागण्या प्रलंबित आहेत. शिवाय, वाहतुकीचे दर, डिझेल-पेट्रोल वाहतूक करणारे टँकर, इथेनॉलचे मिश्रण आदी विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दिनेश पाटील, अजय शहा, जकीखान कायमखानी, आशिष कामदार यांच्यासह जिल्ह्यातील पंप चालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
देशव्यापी संपात लातूरचे पंपचालक होणार सहभागी
By admin | Updated: October 22, 2016 00:37 IST