शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

परसोडा रेल्वेस्थानक मोजतय शेवटच्या घटका?

By admin | Updated: April 17, 2016 01:33 IST

सुभाष कवडे , परसोडा वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील निजामकालीन रेल्वेस्थानकाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रेल्वेस्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी साध्या बाकापासून ते स्वच्छतागृह, अ

सुभाष कवडे , परसोडावैजापूर तालुक्यातील परसोडा येथील निजामकालीन रेल्वेस्थानकाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रेल्वेस्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी साध्या बाकापासून ते स्वच्छतागृह, अशी कोणतीही सुविधा नाही. एवढेच नव्हे येथील निजामकालीन इमारत पडण्याच्या मार्गावर असल्याने हे स्थानक शेवटच्या घटका मोजत आहे. रेल्वे प्रशासनाने मनमाड ते नांदेडपर्यंतचे परसोडा वगळता अन्य सर्व रेल्वेस्थानकांचे नूतनीकरण केले. परसोडा येथील निजामकालीन रेल्वेस्थानकाची अवस्था दयनीय झाली आहे. प्लॅटफॉर्मवरील फरशी पूर्णपणे तुटल्याने प्रवाशांना ठेचा खात तुटलेल्या फरशांवरून ये-जा करावी लागते. स्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी असलेले बाक तुटले आहेत. निवारा शेडची अवस्थाही अत्यंत दयनीय झाली आहे. येथील सार्वजनिक शौचालय १९७२ पासून बंद पडलेले आहे.रेल्वेस्थानक गावाच्या विरुद्ध दिशेने असल्याने प्रवाशांना गावाच्या दिशेने जाण्यासाठी दोन रेल्वे पटऱ्या ओलांडाव्या लागतात. त्यामुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले असून, दोन प्रवाशांना जीव गमवावा लागला. स्थानकावरून वीस ते पंचवीस गावांतील प्रवासी ये-जा करतात. नवीन रेल्वेस्थानकाची इमारत ही जुन्या स्थानकाजवळ बांधण्याऐवजी गावाच्या दिशेने व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. यासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक रवींद्र गुप्ता, नांदेड डिव्हिजनचे आर.के. सिन्हा व केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना निवेदन देण्यात आले होते. या रेल्वेस्थानकाची मंजूर झालेली नवीन इमारत ही गावाच्या दिशेने व्हावी यासाठी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सरपंच मनीषा मरमट, उपसरपंच रमेशराव धाडबळे यांनी दिला. शिवाय मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन लावून धरू, असे शिवसिंग छानवाल, साहेबराव धाडबळे, रामभाऊ कवडे, प्रतापसिंग मरमट, ज्ञानेश्वर कवडे, शेख फकीर महंमद, अंबरसिंग नागालोत, भगवान कवडे, किशोर धाडबले, हंसराज छानवाल, अंकित लोहाडे, शरद नामपल्ली, संजय कवडे यांच्यासह बोरसर, भिवगाव, संबरगाव, परसोडा, सज्जरपूरवाडी, विनायकनगर येथील सरपंच, उपसरपंचांनी सांगितले.