शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

उद्याने झाली बकाल !

By admin | Updated: February 27, 2017 00:25 IST

उस्मानाबाद : शहरातील प्रमुख असलेल्या जिजामाता उद्यानासह विविध भागात पालिकेने उभारलेल्या उद्यानांची बकाल अवस्था झाली आहे़

उस्मानाबाद : शहरातील प्रमुख असलेल्या जिजामाता उद्यानासह विविध भागात पालिकेने उभारलेल्या उद्यानांची बकाल अवस्था झाली आहे़ त्यामुळे सकाळी-सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर जाणाऱ्या वयोवृध्दांसह बालकांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे़उद्याने ही बालकांसह वयोवृध्दांसाठी महत्त्वाची बाब! विशेषत: शहरी भागातील सिमेंटच्या जंगलामध्ये उद्यानाची नितांत आवश्यकता़ शहरी भागात मोकळी हवा मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणून उद्यानांकडे पाहिले जाते़ ही गरज ओळखून नगर पालिकेकडून शहरातील जिजामाता उद्यानाची निर्मिती केली़ त्यापाठोपाठ मागील काही वर्षात शहरातील तांबरी विभाग, गणेश नगर, समता कॉलनी आदी विविध भागातही उपलब्ध जागेनुसार उद्याने, बगिचे तयार करण्यात आले आहेत़ या उद्यानांची उभारणी करण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च केला आहे़ प्रारंभीचा काळ वगळता नंतर मात्र, देखभाल दुरूस्तीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या उद्यानांची बकाल अवस्था झाली आहे़ शहरातील प्रमुख उद्यान असलेल्या जिजामाता उद्यानात मुलांना खेळण्यासाठी बसविण्यात आलेली अनेक खेळणी खराब झाली आहेत़ येथील वॉकवे, कारंजे, पाळण्यांची मोठी दुरवस्था झाली आहे़ नव्हे अनेक खेळण्यांचे लोखंडही चोरीस गेले आहे़ सद्यस्थितीत काही खेळण्यांचे सांगाडे इथे उभा असून, मिळणाऱ्या मोकळ्या जागेतच लहान मुले आपला वेळ घालवीत आहेत़ विशेषत: या उद्यानाच्या आवारातच शौचास बसणाऱ्यांची संख्या वाढल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे़तांबरी विभागातील मुख्याधिकारी यांच्या निवासस्थाना शेजारीही एक उद्यान तयार करण्यात आले होते़ मात्र, या उद्यानाचेही तीन-तेरा झाले आहेत़ मुख्याधिकाऱ्यांच्या घराशेजारी असलेल्या उद्यानाची ही दुर्दैवी अवस्था पाहता पालिकेकडून उद्यानांच्या देखभाल-दुरूस्तीकडेच दुर्लक्ष होताना दिसत आहे़ गणेश नगर भागातील बगिचाचीही वेगळी अवस्था नाही़ येथील साहित्याची नासधूस झाली असून, लहान असलेला वॉकवे, संरक्षक भिंतींचीही पडझड झाली आहे़ दरम्यान, याबाबत पालिकेच्या नगराध्यक्षांसह अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही़