बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा दिग्दर्शक रिभू दास गुप्ता यांचा आगामी सिनेमा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’मध्ये एक अंडरकव्हर एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाची कथा भारतीय एजंटांना वाचविण्याच्या मोहिमेवर असलेल्या परिणीतीच्या व्यक्तिरेखेभोवती फिरणार आहे. सिनेमाची कथा भारत-पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यात परिणिती एजंटची मुख्य भूमिका साकारणार आहे. या सिनेमात रजित कपूर, केके मेनन, दिव्येंदु भट्टाचार्य आणि हार्डी संधूही दिसणार आहेत. याशिवाय परिणीती भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये दिसणारा आहे. यात परिणीती सायना नेहवालची भूमिका साकारताना दिसणार आहे.
अक्षयने पुन्हा मानधनात केली प्रचंड वाढ
अक्षय कुमार सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता आहे. अक्षय एका दिवसाचाही ब्रेक न घेता सतत काम करत असतो. यामुळे त्याचे ४ ते ५ सिनेमे वर्षाला रिलिज होतात. अक्षय कुमारला चित्रपटात घेतल्याने रिस्क कमी होते. कमी बजेटमध्ये एक चांगला चित्रपट बनविला जातो, ज्यामध्ये चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता खूप जास्त असते असे प्रत्येक निर्मात्याला वाटत असते. सुपरहीट चित्रपटांची संख्या आणि वाढती मागणी लक्षात घेत अक्षयने २०२२ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक चित्रपटाची फी वाढवून १३५ कोटी रुपये केली आहे. यापूर्वी अक्षय कुमारने आपली फी ९९ कोटीवरून १०८ कोटी आणि नंतर ११७ कोटींपर्यंत वाढवली होती. त्याचे अनेक चित्रपट केवळ २०२१ मध्येच नव्हे तर २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहेत.