शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे रुपयांत गणवेश खरेदीची पालकांच्या नशिबी कसरत..!

By admin | Updated: May 20, 2017 00:47 IST

उस्मानाबाद : बाजारपेठेतून कितीही हलक्या दर्जाचा कपडा घ्यायचे म्हटले तरी एका मिटरसाठी पन्नास ते शंभर रूपये मोजावे लागतात.

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : बाजारपेठेतून कितीही हलक्या दर्जाचा कपडा घ्यायचे म्हटले तरी एका मिटरसाठी पन्नास ते शंभर रूपये मोजावे लागतात. त्यामुळे मोफत गणवेश योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या दोनशे रूपयांतून आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यासाठी कापड घेणेही कठीण आहे. त्यामुळे दोनशे रूपये कापडावर खर्च झाल्यानंतर शिलाईचे काय? असा प्रश्न आता पालकांसमोर असणार आहे. पूर्वी शाळास्तरावरून एकत्रितरीत्या कपडा अथवा रेडिमेड ड्रेस खरेदी करण्यात येत असत. त्यामुळे दोनशे रूपयांत ‘अडजेस्ट’ होत असे. परंतु, चालू शैक्षणिक वर्षापासून गणवेशाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. त्यामुळे दोनशे रूपयांमध्ये गणवेश बसविण्याची कसरत पालकांना करावी लागणार आहे. दिवसेंदिवस महागाई झपाट्याने वाढत आहे. असे असतानाच दुसरीकडे सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत एका गणवेशासाठी दोनशे रूपये देऊन बोळवण केली जात आहे. मागील काही वर्षांपासून रकमेत वाढ करण्यात आलेली नाही. परंतु, यापूर्वी गणवेशासाठीचे पैसे शाळास्तरावर देण्यात येत होते. या रकमेतून शाळास्तरावरून एकत्रितरीत्या गणवेश खरेदी करण्यात येत होते. अनेकवेळा सहावी, सातवी आणि आठवीच्या वर्गाची विद्यार्थीसंख्या अधिक असल्यानंतर पैसे कमी पडत असत. अशावेळी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी थोडाबहुत आर्थिक हातभार लावीत असत. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थी नवीन गणवेशात शाळेत येत असत. परंतु, चालू शैक्षणिक वर्षांपासून योजनेअंतर्गत प्रत्येकी दोन गणवेशासाठी दिले जणारे प्रत्येकी दोनशे रूपये थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्या येणार आहेत. त्यामुळे आता गणवेश खरेदीची जबाबदारी थेट पालकांच्या खांद्यावर येऊन ठेपली आहे. एकीकडे एखादा रूमाल घ्यायचा म्हटले तरी २५ ते ५० रूपये मोजावे लागतात. दुसरीकडे शासन दोनशे रूपयांमध्ये आठवीच्या वर्गातील म्हणजेच चौदा ते पंधरा वयोवर्षाच्या विद्यार्थ्याला दोनशे रूपयांत गणवेश घ्या, असे सांगत आहे. त्यामुळे ज्या पालकांची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी आहे, ते खिशातून रक्कम घालून गणवेश खरेदी करू शकतात. गावनिहाय विचार केल्यानंतर अशा पालकांची संख्या बोटावर मोजण्याइतपत असते. परंतु, ज्यांचे हातावर पोट आहे, असे पालक जास्तीचे पैसे कोठून आणणार, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे शासनाने सध्याच्या बाजारपेठेचा विचार करून गणवेशासाठी दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करावी अथवा पाठ्यपुस्तकांप्रमाणे गणवेशही शासनानेच पुरवावेत, अशी मागणी पालक वर्गातून होऊ लागली आहे.