शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांच्या मोबाईलवेडाची पालकांना चिंता

By admin | Updated: July 15, 2017 00:13 IST

हिंगोली : मोबाईलच्या सतत वापरामुळे चिमुकल्यांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होत आहेत. लहान मुलांना चष्मा लागणे, शिवाय डोळ्याचे विविध आजारांचे चिमुकले शिकार बनत चालले आहेत.

दयाशील इंगोले, संतोष भिसे । लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मोबाईलच्या सतत वापरामुळे चिमुकल्यांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होत आहेत. लहान मुलांना चष्मा लागणे, शिवाय डोळ्याचे विविध आजारांचे चिमुकले शिकार बनत चालले आहेत. त्यामुळे मुलांना मोबाईलपासून दूरच ठेवावे असा डॉक्टरांतून सल्ला जरी असला तरी दिवसेंदिवस मोबाईलकडे लहान मुलांचा कल वाढतच असल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले. मोबाईलसाठी लहान मुलांकडून होणारा हट्ट त्यांच्यासाठी घातक ठरत आहे. जवळपास सर्वांकडेच आता अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल उपलब्ध आहेत. मोबाईलमध्ये गेम खेळणे किंवा लहान मुल रडत असल्यास त्याची समजूत काढण्यासाठी घरातील मंडळी चिमुकल्यांच्या हाती मोबाईल देतात. परंतु नकळत त्यांना मोबाईल वापराची सवय जडत जाते. मोबाईलकडे लहान मुलांचा कल वाढतोय असे म्हणणारे जास्त आहेत. तर नाही म्हणणारे कमी आहेत. मोबाईलवर लहान मुले जास्त वेळ खेळतात, असे म्हणणारे कमी आहेत. अर्धा तास मुले मोबाईलव खेळतात, यांची संख्या जास्त तर खेळूच देत नाही म्हणणारे बोटावर मोजता येतील एवढे आहेत. कुटुंबातील एका सदस्याकडे अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल जास्त असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. दोन व तीन मोबाईल आहेत, असे म्हणणारे फार कमी आहेत. प्रत्येक वेळी त्यांना मोबाईल देणे शक्य नसते, अशावेळी चिमुकले चिडचिड करतात, तर काही मुले पालकांनी सांगितलेले काम ऐकत नाहीत, असे म्हणणारे काही प्रमाणात आहेत. तर काही जण अभ्यासाकडेही दुर्लक्ष करतात असे म्हणणारे सर्वात कमी आहेत. मुलांना काही प्रमाणात मोबाईल दिला पाहिजे होय म्हणणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे, तर नाहीच म्हणणारे त्यापेक्षा कमी तर काही प्रमाणात मोबाईल मुलांच्या हाती द्यावा म्हणणारे जास्त प्रमाणात आहेत.लहान मुलांच्या हातात मोबाईल द्यावा किंवा नाही, याबाबत पालकांत संभ्रम आहे. दिल्यास मोबाईल वापरण्याची सवय जडल्यास लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होणार, हे मात्र निश्चित आहे. याबाबत डॉ.गोपाल कदम म्हणाले, लहान मुलांमधील मोबाईलमॅनिया वाढत आहे. मात्र मुलांना ही सवय न लागण्याची काळजी पालकांनीच घेणे गरजेचे आहे. त्यापेक्षा त्यांना मैदानी खेळांकडे वळविले पाहिजे. त्यांना पुरेसा वेळ दिला पाहिजे. पूर्वी मोठे कुटुंब असल्याने आई-वडिलांशिवाय इतरांचे मुलांवर लक्ष असायचे. आता त्रिकोणी कुटुंबात ते शक्य होत नाही. मग मोबाईल मुलांच्या हाती दिला जातो. जेकी अत्यंत चुकीचे आहे. त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. एवढेच काय तर मोबाईल गरज म्हणून दिला तरीही किशोरवयीन मुलेही मोबाईलचा वापर नेमका कसा करतात, हेसुद्धा पालकांनी तपासले पाहिजे.