शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

परभणीला अधिकारी येईनात

By admin | Updated: June 15, 2017 00:06 IST

परभणी :इतर जिल्ह्यातून परभणी येथे बदली झालेले अधिकारी परभणीत येण्यास उत्सूक नसल्याने येथून बाहेर जिल्ह्यात बदली झालेले अधिकारी परभणीत अडकून पडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : इतर जिल्ह्यातून परभणी येथे बदली झालेले अधिकारी परभणीत येण्यास उत्सूक नसल्याने येथून बाहेर जिल्ह्यात बदली झालेले अधिकारी परभणीत अडकून पडले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी बदलीचे आदेश निघूनही या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप पदमुक्त केलेले नाही.येथील जिल्हा प्रशासनातील उपजिल्हाधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांच्या पंधरा दिवसांपूर्वी बदल्या झाल्या आहेत. त्यात पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी सुनील महेंद्रकर यांची बदली नांदेड येथे भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी म्हणून झाली आहे. निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांची बदली नांदेड येथे झाली आहे. तर सेलू येथील उपविभागीय अधिकारी पी.एस. बोरगावकर यांची बदली हिंगोली येथे झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे राजेश खंदारे यांची बदली उस्मानाबाद येथे निवासी उपजिल्हाधिकारी पदावर झाली आहे.जिल्ह्यातील चार उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, त्यांच्या जागी तीन नवीन अधिकारी जिल्ह्याला मिळाले आहेत. नांदेड येथील निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांची परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. तसेच औरंगाबाद येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांची बदली परभणीत भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी पदी झाली ंआहे. बदल्यांचे आदेश निघून पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरी हे अधिकारी परभणीत रुजू झाले नाहीत. त्यामुळे येथून इतर ठिकाणी बदली झालेले अधिकारीही अडकून पडले आहेत.