शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

समांतरचे गाडे रुतले...!

By admin | Updated: October 27, 2014 00:13 IST

विकास राऊत, औरंगाबाद महापालिकेचे बहुचर्चित पीपीपी या धर्तीवरील समांतर जलवाहिनीचे काम सुरू होऊन २ महिने झाले असले तरी २०० कोटींच्या रकमेवरून जलवाहिनीच्या कामाचे घोडे अडले आहे.

विकास राऊत, औरंगाबादमहापालिकेचे बहुचर्चित पीपीपी या धर्तीवरील समांतर जलवाहिनीचे काम सुरू होऊन २ महिने झाले असले तरी २०० कोटींच्या रकमेवरून जलवाहिनीच्या कामाचे घोडे अडले आहे. नवीन राज्य सरकार सत्तेवर आल्यानंतरच योजनेच्या कामाला गती येण्याची शक्यता आहे. शासनाकडून महागाई निर्देशांकानुसार वाढलेले २०० कोटी रुपये मिळाले नाहीत, तर ती रक्कम जनतेकडूनच वसूल केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन महिने उलटले असून कामाला अजून सुरुवात झालेली नाही. नागरिकांच्या माथी वाढीव पाणीपट्टी आणि टंचाई आलेली आहे. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या १६२ कोटी रुपयांच्या निधीवर ७० कोटी रुपयांचे व्याज जमा झाले आहे. या ७० कोटींवर योजनेचे कंत्राटदार कंपनीचा डोळा आहे. घाट्यात काम सुरू केल्यामुळे ते ७० कोटी रुपये पदरात पडल्यास व वाढीव २०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळाल्यास जलवाहिनीसाठी लागणारे पाईप खरेदी करण्यासाठी पाऊल उचलले जाईल. असे सूत्रांनी सांगितले. २०११ रोजी झालेल्या अंतिम निविदा व करारानुसार १० एमएम जाडीची १७०० मि़मी़व्यासाची पाईपलाईन पैठण ते नक्षत्रवाडीपर्यंत टाकण्याचे काम प्रस्तावित आहे़ त्या जलवाहिनीचा दर करारावेळी २४ हजार ८६७ रुपये रनिंग मीटर होता़ वर्ष २०१२-१३ च्या डीएसआरनुसार त्या जलवाहिनीचा दर २५ हजार ३८२ रु़रनिंग मीटर झाला आहे़ ५१५ रुपये प्रति रनिंग मीटर दर वाढल्यामुळे २५ कोटी रुपयांनी जलवाहिनी महागली. सध्या हा दर ६१५ रुपयांच्या आसपास गेला आहे. पैठण ते नक्षत्रवाडी हे अंतर ४५ कि़मी़ आहे़ १ कि़मी़मध्ये अंदाजे १ हजार मीटर अंतर असते़ त्यानुसार ४५ हजार मीटर अंतराची जलवाहिनी समांतरच्या योजनेत टाकावी लागेल़ ६१५ रुपये प्रति रनिंग मीटरप्रमाणे ३२ कोटी १७ लाख ५ हजार रुपये जास्तीचा खर्च वाढला आहे़ १२४ कोटी २१ लाख ९० हजार रुपये जलवाहिनीवर खर्च होणार आहेत़ ३०० मि.मी़च्या अंतर्गत जलवाहिन्या पॉलिथिलीनच्या असतात़ त्यावरील एमएसच्या असतात़ शहरात ४००, ५००, ६०० मि़मी़व्यासाच्या जलवाहिन्या आहेत़ त्यामध्येही दरवाढ झाल्याचे डीएसआरवरून दिसते़