लातूर : शहरातील गांधी चौक ते शिवाजी चौक या रस्त्यास समांतर असलेल्या उद्योगभवनपासून जाणार्या रस्त्यावर अवैध वाहने उभी करण्यात येत आहेत़ त्यामुळे हा रस्ता अवैध वाहनांचा तळ बनला़ परिणामी रहदारीस वारंवार अडथळा निर्माण होत असतानाही वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने पादचार्यांसह दुचाकीस्वारांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़ शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या लातूरची बाजारपेठ ही प्रसिध्द असल्याने विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची दररोज मोठ्या प्रमाणात रेलचेल असते़ लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमालास चांगला भाव मिळतो अशी धारणा असल्याने जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यातील शेतकरी शेतीमाल घेऊन विक्रीसाठी येत असतात़ त्याचबरोबर विविध कामानिमित्ताने येणार्यांची संख्या वेगळीच आहे़ शहरात येणार्या वाहनधारकांच्या सोयीसाठी गेल्या काही वर्षांपूर्वी समांतर रस्ताही तयार करण्यात आला आहे़ लातुरातील गांधी चौक ते शिवाजी चौक या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते़ ही गर्दी कमी व्हावी या उद्देशाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयापासून औषधीभवन समोरुन समांतर रस्ता तयार करण्यात आला़ वाहनांची वाढती गर्दी पाहून अरुंद असलेला हा रस्ता पुन्हा रुंद करण्यात आला़ काही महिन्यांपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करुन दुहेरी रस्ता तयार करण्यात आला आहे़ रस्ता रुंद झाल्यामुळे आता वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा होती़ परंतु, या रस्त्यावर आता अवैध वाहनधारकांनी कब्जा करीत वाहनतळच बनविले आहे़ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय ते औषधीभवननजीकच्या छोट्या उड्डाणपुलानजीकच्या अंतरापर्यंतच्या रस्त्यावर अवैध वाहने उभी करण्यात आलेली नेहमी पहावयास मिळते़ या अवैध वाहनतळामुळे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात जा- ये करणार्या रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे़ त्याचबरोबर पादचार्यांनाही सुरक्षित जा- ये करणे कठीण बनले आहे़ तसेच अनेकदा वाहनधारकांना नाईलाजास्तव चुकीच्या बाजूने जा- ये करावी लागत असल्याचे दिसून येत आहे़ वाहनांच्या या थांब्यामुळे अपघात होण्याची भिती नाकारता येत नाही़ या परिसरात छोटी- मोठी किमान दररोज ६०० च्या जवळपास वाहने उभी असतात़ तसेच गांधी चौक ते शिवाजी चौक या रस्त्याला समांतर रस्ता खोरी गल्लीतूनही आहे़ मात्र हा रस्ता अरुंद असल्याने एकाचवेळी दुहेरी वाहतूक होणे कठीण आहे़ मात्र, इतका अरुंद रस्ता असतानाही काहीजण त्याच ठिकाणी वाहने उभी करीत असल्याने त्याचाही त्रास सहन करावा लागत आहे़ (प्रतिनिधी)शहरातील गांधी चौकातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाची इमारत आहे़ गेल्या काही वर्षांपासून ही इमारत वापराअभावी पडून आहे़ या इमारतीचा परिसरही अवैध वाहनांचे तळ बनले आहे़ या ठिकाणी दररोज १५ ते २० वाहने उभी करण्यात आलेली असतात़ पाळीप्रमाणे वाहनधारक वाहने काढून प्रवासी वाहतूक करीत असतात़ विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांची नेहमी या ठिकाणावर नजर जाते़ वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे या ठिकाणी वाहने उभी करण्यात येत असल्याचे पहावयास मिळते़शहरातून बाहेरील शहराकडे धावणार्या ट्रॅव्हल्सचा रात्रीचा थांबा हा अशोक हॉटेल परिसर आणि सिग्नल कॅम्पजवळील छोटा उड्डाण पूल आहे़ रात्रीच्या वेळी ट्रॅव्हल्स थांबत असल्याने नेहमी वाहतुकीचा खोळंबा होत असतो़ अनेकदा येथील गर्दीतून मार्ग काढणेही कठीण होते़ त्यामुळे अपघाताची भिती व्यक्त होत आहे़
समांतर रस्ता बनला वाहनांचा तळ !
By admin | Updated: May 23, 2014 00:18 IST