औरंगाबाद : महापालिकेतील विद्यमान १०४ नगरसेवकांचे सत्तेतील ७ महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त कामे करून २०१५ च्या निवडणुकांना सामोरे जाण्याच्या तयारीत असलेल्या नगरसेवकांच्या मनसुब्यांवर प्रशासनाने आज पाणी फेरले. जुन्यांपैकी ज्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे, तीच कामे पूर्ण होतील. ज्या नगरसेवकांचे कुठलेही काम बजेटमध्ये नाही. त्यांचे ३० लाख रुपयांपर्यंतचे काम करण्याची तरतूद केली जाईल. नवीन विकासकामे होणे अशक्य आहे, असे स्पष्टीकरण आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आज सभागृहात दिले. मनपाच्या अर्थकारणाचे वास्तव त्यांनी सभागृहात मांडल्यामुळे नगरसेवकांनी स्पील ओव्हरच्या (शिल्लक कामे) कामांमुळे आक्रमकपणे उपसलेली तलवार नगरसेवकांनी म्यान केली. महापौर कला ओझा यांनी आदेश दिले की, आचारसंहितेपूर्वी नगरसेवकांच्या प्रलंबित संचिकांवर प्रशासनाने तातडीने स्वाक्षऱ्या कराव्यात. ही तर नागरिकांची थट्टाशहरात काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. ड्रेनेज चोक अप आहेत, पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, अशी नागरिकांची थट्टा सुरू आहे. मनपाने भूमिका बदलली नाहीतर सभागृह चालू देणार नाही, असा इशारा नगरसेवक मुजीब खान यांनी दिला. प्रशासन कुठे चालले आहे, ते चालविणारे कुठे चालले आहेत, नगरसेवकांना स्पील ओव्हरची कामे होणार नाहीत एवढे सांगितले जात आहे. महापौरांनी त्यांच्या वॉर्डात कोट्यवधींची कामे टाकून घेतली. काही वॉर्डांमध्ये ४ कोटींची कामे तर कुठे एकही काम नाही. ही सावत्र वागणूक दिली गेली आहे. १०० कोटींच्या पथदिव्यांच्या योजनेची निविदा काढली जात आहे. ती रक्कम कुठून देणार हा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.महापौरांकडून दुरुपयोगसभागृहाने महापौरांना बजेटमध्ये तरतुदी करण्याचे अधिकार दिले होते. मात्र, महापौरांनी त्या अधिकाराचा दुरुपयोग केल्याचे स्पष्ट झाल्याचा आरोप नगरसेवक प्रमोद राठोड यांनी केला. कोणती कामे होणार ते सांगापथदिव्यांचे १०० कोटींचे कंत्राट दिले जाणार आहे, भूमिगत गटार योजना मार्गी लागली आहे. समांतरचे काम सुरू होणार आहे. वॉटर, गटार, मीटरचा प्रश्न संपला असेल तर मनपा यापुढे कोणती कामे करणारे ते सांगावे, असे नगरसेवक त्र्यंबक तुपे म्हणाले. नगरसेवक संजय केनेकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीपासून कामे थांबलेली आहेत. विकासकामे कधी होणार हे प्रशासनाने स्पष्ट करावे. खासदार व पदाधिकाऱ्यांमध्ये स्पील ओव्हरच्या कामांवरू न चार वेळा बैठका झाल्या तरीही काही परिणाम होत नाही.
नवीन विकासकामांवर गंडांतर!
By admin | Updated: August 12, 2014 02:01 IST