शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

पपई उत्पादनातून शेतकऱ्यांसमोर ठेवला आदर्श

By admin | Updated: December 15, 2015 23:43 IST

प्रसाद आर्वीकर, परभणी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी वर्षभर शासनासोबत दोन हात करणाऱ्या कॉ़ विलास बाबर यांनी स्वत:च्या शेतीत अभ्यासपूर्ण बदल करीत शेतकऱ्यांसमोर एक परिपाठ निर्माण केला आहे़

प्रसाद आर्वीकर, परभणी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी वर्षभर शासनासोबत दोन हात करणाऱ्या कॉ़ विलास बाबर यांनी स्वत:च्या शेतीत अभ्यासपूर्ण बदल करीत शेतकऱ्यांसमोर एक परिपाठ निर्माण केला आहे़ सरकार आणि निसर्ग दोघेही साथ देत नाही, अशा वेळेला स्वत: खंबीर होऊन सक्षम बनावे, असा सल्ला त्यांनी यानिमित्ताने दिला़ कॉ़ विलास बाबर हे तालुक्यातील सुरपिंपरी येथील शेतकरी़ डाळींब, ऊस ही पिके पाणी नसल्याने पिके पूर्णत: मोडून काढली आणि यावर्षी निर्माण झालेल्या वातावरणाचा अभ्यास करीत पपईचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला़ तैवान ७८६ या वाणाच्या पपईची तीन एकरात लागवड केली़ विहिरींचे पाणी कमी झाल्याने शेततळे घेऊन पपईसाठी संरक्षित पाणीसाठा उपलब्ध केला़ सर्वसाधारणपणे पपईचे एकरी ४० टन उत्पन्न मिळते. मात्र आपण योग्य नियोजन केल्याने एकरी ५० टन उत्पन्न मिळेल, अशी आशा त्यांना आहे़ सध्या ६० टन पपई मुंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविली आहे़ पपई हे सर्वात नाजूक पीक आहे़ लवकर रोगाचा प्रादुर्भाव होतो़ त्यामुळे प्रत्येक वेळी या पिकाची निगा राखत रोग होऊ नये, याची काळजी घेतली़ परिणामी आज दर्जेदार उत्पादन निघाले आहे आणि बाजारात चांगली मागणी मिळाली़ तज्ज्ञांचा सल्ला घेतला जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांवर संकटांची मालिका सुरू आहे़ अशा स्थितीत शेतकऱ्यांनी खर्च न वाढविता पिकांचे उत्पादन घ्यावे़ बाजारपेठेचा अभ्यास करावा़ आपल्याकडे कृषी विद्यापीठ आहे़ काही शेतकऱ्यांनी चांगले बदल करीत प्रयोगशीलता जोपासली आहे़ अशा तज्ज्ञांशी संपर्कात रहावे आणि संपूर्ण नियोजन करून पीक घ्यावे़ मी देखील हे बदल केले आहेत़ -कॉ़ विलास बाबर