शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

अभियांत्रिकीचा पेपर फुटल्याची अफवा

By admin | Updated: May 24, 2016 01:22 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या अभियांत्रिकी द्वितीय वर्षाचा गणिताचा पेपर फुटल्याची अफवा सोमवारी दिवसभर फिरत होती.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या अभियांत्रिकी द्वितीय वर्षाचा गणिताचा पेपर फुटल्याची अफवा सोमवारी दिवसभर फिरत होती. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ही बाब विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली असता हे ऐकून सुरुवातीला प्रशासन हादरले. त्यांनी शहरातील सर्व परीक्षा केंद्रांकडे यासंबंधीची तात्काळ चौकशी केली, तेव्हा मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याची माहिती समोर आली. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षेला १३ मेपासून सुरुवात झाली. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये अभियांत्रिकीचे १९ परीक्षा केंद्रे असून, यापैकी १२ परीक्षा केंद्रे औरंगाबाद शहरात आहेत. या परीक्षेला सकाळी १० वाजता प्रारंभ होतो. तत्पूर्वी, सर्व परीक्षा केंद्रांवर विद्यापीठाकडून त्या- त्या दिवशीच सकाळी ८.३० वाजता आॅनलाईन पेपर पाठविले जातात. दरम्यान, आज सकाळी ८.३० ते ९.३० वाजेदरम्यान काही विद्यार्थ्यांच्या व्हॉटस्अ‍ॅपवर अभियांत्रिकी द्वितीय वर्षाच्या गणित (क्रमांक-४) पेपरचे काही प्रश्न फिरत असल्याची कुणकुण लागली. मात्र, दिवसभरात एकाही विद्यार्थ्याने अथवा संबंधित परीक्षा संचालकांनी किंवा प्राचार्यांनी यासंबंधीची तक्रार विद्यापीठ परीक्षा विभागाकडे केलेली नव्हती. परीक्षा नियंत्रक डॉ. नेटके यांनी खोलात जाऊन यासंबंधीची चौकशी केली तेव्हा आजचा पेपर फुटला नसल्याची माहिती समजताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. काही अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर एक-दोन गेस प्रश्न व्हायरल झाले होते. तोच धागा पकडून काही जणांनी खोडसाळपणे अभियांत्रिकी द्वितीय वर्षाचा गणिताचा पेपर फुटल्याची अफवा पसरवली. ही अफवा वाऱ्यासरशी विद्यापीठात पोहोचली आणि विद्यापीठ प्रशासन हादरून गेले. अफवा पसरविणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध विद्यापीठ प्रशासन घेत आहे.दुपारी पेपर फुटल्याची माहिती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडून समजली तेव्हा सर्व केंद्रप्रमुख तसेच प्राचार्यांकडून माहिती जाणून घेतली. तेव्हा असा प्रकार कुठेही घडलेला नसल्याचे समजले. यासंबंधीची तक्रार एकाही परीक्षार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, केंद्रप्रमुखांनी लेखी, तोंडी दिलेली नाही. ही केवळ अफवा आहे, असे परीक्षा नियंत्रक डॉ. दिगंबर नेटके यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनीही परीक्षेदरम्यान सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत.