शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बंदोबस्तात तूर खरेदी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:01 IST

हिंगोली : शासनाने पुन्हा तूर खरेदीचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी पोलीस बंदोबस्तात सकाळी सहा वाजेपासून तूर खरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. मात्र टोकन दिलेल्या व कागदपत्रे तपासून घेतलेल्या १८४ शेतकºयांचीच तूर घेतली जाणार असून नोंदणी केलेल्या ४८८५ शेतकºयांचा प्रश्न लटकलेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शासनाने पुन्हा तूर खरेदीचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी पोलीस बंदोबस्तात सकाळी सहा वाजेपासून तूर खरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. मात्र टोकन दिलेल्या व कागदपत्रे तपासून घेतलेल्या १८४ शेतकºयांचीच तूर घेतली जाणार असून नोंदणी केलेल्या ४८८५ शेतकºयांचा प्रश्न लटकलेला आहे.मागील सहा महिन्यांपासून चर्चेत असलेल्या तूर प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काही निघाला नाही. वारंवार मिळणारी मुदतवाढ, बंद पडणारे केंद्र यातच वेळ जास्त वाया गेला. त्यातही व्यापाºयांनी घुसखोरी करून आपली कमी भावात घेतलेली तूर विकून चांदी करून घेतली. शेतकरी मात्र रांगेतच राहिले. प्रतीक्षेत रात्रंदिवस मोंढ्यात काढले. मात्र त्यांचा काही क्रमांक लागला नाही. काही शेतकºयांनाच हा त्रास झाला. अनेक शेतकºयांची तूर या केंद्रावर विकलीही गेली. नंतर खरेदी केंद्र बंद पडले. काही केंद्रांवर तूर सडली. पुन्हा आदेश आले तर त्यात इतक्या किचकट अटी आहेत की, शेतकºयांच्या घरापर्यंत जावून तपासणी करता येणार आहे. शिवाय टोकन असेलल्यांचीच तूर खरेदी होत आहे. तुरीचा ओलावा तपासला जात आहे.तहसीलदारांनी हिंगोली केंद्रावर १८८ शेतकºयांच्या कागदपत्राची तपासणी करुन त्यांची तूर खरेदी करण्याच्या सूचना खरेदी विक्री संघाला दिल्या होत्या. मात्र यातील चार शेतकºयांना पैशाची गरज असल्याने त्यांनी मिळेल त्या दरात तुरीची विक्री केली. नोंदणी केलेल्या काही शेतकºयांना नोंदणीचा एसएमएस आला. परंतु यादीत नावेच दिसत नसल्याने शेतकरी पुन्हा हैराण आहेत. गुरुवारी जिल्हा उपनिबंधकांनी तूर खरेदीचा आढावा घेतला. अजूनही व्यापाºयाचीच तूर खरेदी होत असल्याची शंका काही शेतकरी व्यक्त करीत आहेत. पुन्हा सुरु केलेल्या तूर खरेदीचा फायदा व्यापाºयांना न होता शेतकºयांना व्हावा. यासाठी शेतकºयांच्या कागदपत्रांची तपासणी बारकाईने होणे गरजेचे आहे.पहिल्याच दिवशी तब्बल ४५ शेतकºयांची ८३६. ५० क्विंटल तुरीची खरेदी केली. आता १३९ शेतकºयांची तूर खरेदी बाकी आहे. जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसात तीही खरेदी होणार असल्याचा अंदाच खरेदी विक्री संघातर्फे सांगितला.