शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामे झालेल्या तुरीचेच माप !

By admin | Updated: May 11, 2017 23:43 IST

लातूर : नाफेड अंतर्गत लातूर जिल्ह्यात आठ खरेदी केंद्रांवर २ लाख ४९ हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली असून २२ एप्रिलपूर्वी नोंदी (पंचनामा) झालेल्या ७० हजार क्विंटल तुरीची खरेदी सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : नाफेड अंतर्गत लातूर जिल्ह्यात आठ खरेदी केंद्रांवर २ लाख ४९ हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली असून २२ एप्रिलपूर्वी नोंदी (पंचनामा) झालेल्या ७० हजार क्विंटल तुरीची खरेदी सुरू आहे. यातील १९ दिवसांत १६ हजार ८०० क्विंटल तुरीची खरेदी झाली असून ५३ हजार २०० क्विंटल तुरीचे माप सध्या सुरूच आहे. दरम्यान, शासनाकडून तूर खरेदी केंद्रांना मुदतवाढ दिली असल्याचे सांगितले जात असले, तरी अद्याप जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयास हे आदेश प्राप्त झाले नाहीत.लातूर जिल्ह्यात लातूर, उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर, मुरुड, रेणापूर, औसा, शिरूर अनंतपाळ येथे नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. ५ हजार ५०० रुपये क्विंटल दराने या केंद्रावर तूर खरेदी करण्यात येत होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी या केंद्रावर तूर विक्रीसाठी गर्दी केली होती. २२ मे पर्यंत १६ हजार शेतकऱ्यांची २ लाख ४९ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. २२ मे रोजी पंचनामे झाल्यानंतर १ हजार ६० शेतकऱ्यांची १६ हजार ८०० क्विंटल तूर खरेदी केली. उर्वरित तुरीचे माप सुरु आहे. तूर खरेदी केंद्र बंद केल्याने २२ एप्रिलनंतर तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची तूर घेण्यात आली नाही. केंद्रावर पंचनामे झालेल्याच तुरीचे माप घेण्यात येत आहे. ९४ कोटींचे पेमेंट करण्यात आले असून, २९ कोटींचे पेमेंट शासनाकडे थकले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांकडून तूर खरेदी केंद्र चालू ठेवण्याची मागणी होत असली, तरी अद्याप शासनाकडून तसे आदेश आले नसल्यामुळे पंचनाम्याव्यतिरिक्त तुरीची खरेदी बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.