शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पंचनाम्याचा नुसताच फार्स

By admin | Updated: August 9, 2014 00:38 IST

लातूर,हरी मोकाशे यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ५ हजार ७११ एकरवरील नामांकित कंपन्याचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी

 

लातूर,हरी मोकाशे  यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ५ हजार ७११ एकरवरील नामांकित कंपन्याचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी २ हजार १९७ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या़ त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या़ बहुतांशी शेतकऱ्यांना अद्यापही बियाणे मिळाले नाही़ दरम्यान, कृषी विभागाकडून करण्यात येत असलेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम पूर्णत्वाकडे आले असले तरी शेतकऱ्यांसाठी कुठल्याही मदतीची ठोस उपाययोजना नाहीत. पंचनाम्याचा नुसताच फार्स सुरु आहे. जिल्ह्यात खरीपातील सोयाबीनचे अपेक्षित क्षेत्र ३ लाख ५५ हजार हेक्टर आहे़ नगदी पीक म्हणून जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे राहिला. यातच यंदाच्या हंगामात उशिरा अल्प पाऊस झाला़ त्यामुळे तूर, उडीद, मूग या पिकांच्या पेरणीचा कालावधी संपुष्टात आल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनवर भर दिला़ गेल्या वर्षी सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्याने शासनाने घरगुती बियाणांचा वापर करण्याचे आवाहन केले़ काही शेतकऱ्यांनी उत्पादन घटू नये म्हणून नामांकित कंपन्यांच्या बियाणांचा वापर केला़ पेरणी झालेल्या ३ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रापैकी मोठ्या प्रमाणात घरगुती बियाणांचा वापर झाला़ जवळपास ३० टक्के क्षेत्रावर कंपन्यांच्या बियाणांचा वापर करण्यात आला़ परंतु, बोगस बियाणे लागल्याने काही शेतकऱ्यांच्या बियाणांची उगवण झाली नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील २ हजार १९७ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या़ या शेतकऱ्यांचे ५ हजार ७११ एकरवरील बियाणाचे नुकसान झाले़ या तक्रारींची लातूरच्या कृषी सहसंचालकांनी दखल घेऊन बियाणे न उगवलेल्या शेतकऱ्यांना नव्याने बियाणे देण्याचे आदेश कंपन्यांना दिले़ यातील काही शेतकऱ्यांना नव्याने बियाणे मिळाले़ खत, पेरणी खर्चाचे नुकसान सहन करता येईल, अशी मानसिकता ठेऊन नवे बियाणे मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती़ परंतु, बहुतांशी शेतकऱ्यांना अद्यापही बियाणे मिळाले नाही़ परिणामी, पेरणीचा हंगाम संपुष्टात आला आहे़ त्यामुळे आता नव्याने जरी बियाणे मिळाले तरी काय उपयोग असा सवाल शेतकऱ्यांतून होत आहे़ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सोयाबीन शेतीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली़ त्यामुळे आजपर्यंत १ हजार ४१७ शेतकऱ्यांचे पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे़ हे पंचनामे करण्यात येत असले तरी या पंचनाम्यातून काय साध्य होणार आहे? याबाबत कृषी विभागही अनभिज्ञ आहे़ भरपाईच मिळणार नसेल तर पंचनामेच कशासाठी? असा सवाल शेतकऱ्यांतून होत आहे. कंपन्यांच्या बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे़ त्यामुळे कंपन्यांनी एकरी उत्पादनाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यायला हवी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापूरे यांनी केली आहे़ बोगस बियाणामुळे सर्वाधिक नुकसान निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांचे असून १ हजार ३९ तक्रारी आहेत़ तिथे ६८८ शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहेत़ त्यापाठोपाठ औसा तालुक्यातील आणि त्यानंतर लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे़ औशातील संख्या ६१० तर लातूर तालुक्यातील संख्या १४८ अशी आहे़ कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात येत असले तरी शासनाकडून कुठलीही मदत मिळणार नाही़ त्यामुळे बोगस बियाणे बाजारात आणलेल्या कंपन्यांना भरपाई देण्याचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत़ ते मंजूर करुन कितपत भरपाई द्यायची हे कंपन्यांवर अवलंबून आहे, असे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे मोहीम अधिकारी महेश क्षीरसागर यांनी सांगितले़